पान:अभिव्यक्ती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. कृ. कोल्हटकरांच्या नाटकातील सामाजिकता/२१


होते romantists चे आणि एकीकडे वास्तवाच्या जाणिवा व्यक्त कराव्याशा वाटत होत्या. या पातळ्या परस्पर पूर्णतः भिन्न असल्यामुळे कोल्हटकरांच्या नाटकांना वैचारिक सामर्थ्य प्राप्त होऊ शकले नाही.
 व्यावहारिक नीतीचे आणि सामाजिक संकेतांचे तत्त्वज्ञान कोल्हटकर कसोशीने आपल्या नाटकांत पाळतात; पण सामाजिक समस्येतील खाजगी स्वरूप गळून जाऊन कलावंताचे वेगळे विश्व निर्माण करण्यात असमर्थ ठरतात. मात्र त्यांच्या काही नाटकांत (सहचारिणी, परिवर्तन) सामाजिक आशय संपूर्ण नाटकभर स्मरणात राहील या पद्धतीने आलेला आहे. पण नाटकातील वातावरण आणि सामाजिक प्रश्न यांतील नाते प्रस्थापित करण्यात ते अयशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या नाटकांच्या संदर्भात सेंद्रियत्वाचा प्रत्यय येऊ शकत नाही. 'नाट्यकलारुक्कुठार' या नाट्यविवेचक ग्रंथात कोल्हटकरांच्या 'गुप्तमंजूष' या नाटकाविषयी म्हटले आहे. "स्त्री-शिक्षणाचा प्रसार अधिक करणे ही सुधारणा किती जरी आवश्यक असली, किती वंद्य असली, तरी ती सुधारणा चांगली असे जर लोकांच्या मनावर तुम्हाला ठसवायचे असेल तर त्याला मार्ग फार निराळे आहेत." हे मतही या संदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे.
सामाजिकतेचा आभास
 'सामाजिक नाटककार' हा कोल्हटकरांचा खरा 'धर्म' नव्हता कारण त्यांच्या सामाजिकतेचा आभास निर्माण करणाऱ्या' नाटकात कुठेही सामाजिक किंवा कौटुंबिक जीवनातील संघर्ष, थरारून सोडणारे नाट्य, गंभीर कारुण्य वा रसिकांना अंतर्मुख बनविण्याचे सामर्थ्य नाही.
 त्यांच्या नाटकांतील व्यक्तिरेखा सामाजिक कलाकृतीतील व्यक्तींप्रमाणे एकाच वेळी अनन्यसाधारण व समाजाचे प्रतीक (symbol) बनत नाहीत. या व्यक्तींचा 'माणूस' म्हणून प्रत्यय येत नाही. कोल्हटकरांच्या नाटकाचे 'गणित' आणि 'उत्तर' ठरलेले असल्यामुळे या अतिम उत्तराला अनुलक्षून व्यक्तींचे आवरण त्यात येते. व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व व जीवन या दोहोंचा अंगभूत घटक, नाटकातील सामाजिक समस्या असली पाहिजे. देवलांच्या 'शारदा' नाटकातील समस्येला यामुळेच कलापूर्णता लाभली आहे. 'शारदे' चे दुःख सामाजिक बनले आहे. 'शेक्सपिअरप्रमाणे रचना करूनही कोल्हटकर बहुतांशी अपयशी ठरले' असे विधान श्री. द. रा. गोमकाळे यांनी 'मराठी रंगभूमीवरील शेक्सपिअरचा अवतार' या लेखात म्हटले आहे.
'तंत्र' हे कालसापेक्ष व व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे ते सार्वकालीन असू शकत नाही. अशा या केवळ 'तंत्रा'चे आकर्षण त्यांना वाटले व गुंतागुंतीची रचना, काव्य- कल्पना यांचाच त्यांनी अवलंब केला. मराठी नाटककारांना शेक्सपिअर, मोलिअर,
 ८. नाट्यकलारुक्कुठार (पृष्ठ ४०)