पान:अभिव्यक्ती.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८/ अभिव्यक्ती

झाला नाही तरी त्यापासून विशेष तोटा होऊ नये ' (?) इतकी खबरदारी घेतली आहे. हीच कोल्हटकरांची नाटकाकडे पाहाण्याची खरी दृष्टी. आपले नाटक समाजाला हितकारक-उपकारक-ठरावे आणि तसे शक्य नसल्यास निदान त्यापासून हानी होऊ नये. उपयुक्ततावादी लेखकाला घ्यावी लागणारी अशी ही खबरदारी आपण घेतल्याचे प्रामाणिक मत कोल्हटकर स्पष्टपणे प्रतिपादतात. यावरून 'मुक्तामाला' दी कादंबऱ्या आणि कोल्हटकरांची नाटके यांची जातकुळी खरोखर एकच आहे असे वाटायला लागते. कोल्हटकर संविधानकाची जुळणी करतात. अनेकदा त्यांनी 'रचनेची' भाषा वापरली आहे. संविधानक स्वाभाविकपणे न उमलता ते रचले जाते. त्यांच्या 'साध्या' च्या दृष्टीने माणसं बेतली जातात. त्यात सर्जन ( creation ) नाही तर गणित आहे. “राजाराणी, प्रधानपुत्र, सरदारकन्या, नामांतरे, वेषांतरे, पण, प्रतिज्ञा इत्यादी मालमसाला असलेल्या त्यांच्या नाटकांची गुंतागुंतीची संविधानके लहान मुलांसाठी लिहिलेल्या एखाद्या परीकथेची आठवण आपणास सतत करून देत असतातरे.
खऱ्या सामाजिक नाटकाची उणीव
 या Fancy कडे कल असलेल्या नाटकांतच कोल्हटकरांनी आपल्याला अभि- प्रेत असलेला सामाजिक आशय चिकटविण्याचा प्रयत्न केला. एकीकडे बाल्यसुलभ अद्भुतरम्य वातावरण तर अगदी त्याच वेळी कल्पनाविलासांनी भरलेली संभाषणे प्रौढत्वाची आठवण करून देतात. हे दोन अनुभव इतके परस्पर विसंगत व विसंवादी आहेत की ते एकमेकांत नीटसे मिसळून जाऊ शकत नाहीत व त्यांतून एकसंध (unique) कलात्मक अनुभव जन्माला येऊ शकत नाही. कै. आचार्य अत्रे यांनी एका प्रस्तावनेत म्हटले आहे की, “सामाजिक नाटकाची पहिली कसोटी म्हणजे ते वास्तववादी पाहिजे. त्यात अद्भुतरम्यता औषधापुरतीदेखील असता कामा नये. आचार्य अत्र्यांच्या वरील मताचा विचार केला तर कोल्हटकरांची नाटके सामाजिक नाटकाच्या पहिल्याच कसोटीला उतरत नाहीत. चमत्कृतिजन्यता, अद्भुतरम्यता, योगायोग यांच्या गर्दीत त्यांच्या नाटकातील सामाजिकता लुप्त झाली आहे. 'जन- मनाची भावनात्मक पकड घेणारे प्रभावी व्यक्तित्व निर्माण करून किंवा प्रमेय उद्- भावित करून संघर्षातून, प्रसंगातून त्याच्या उत्कटतेची तार चढवीत नेणे हे कोल्हट- करांना, काही थोडे अपवाद वगळल्यास, कधीच जमले नाही.४ ' आपल्या पद्धतीने त्यांनी समाजसुधारणेचे विचार नाटकामध्ये व्यक्त केले आहेत; पण त्याच नाट्याला आपल्या विचारांचे प्रभावी साधनसुद्धा त्यांनी मानले नाही. 'व्यक्तिमत्त्वाच्या दर्शना-


२. श्रीपाद कृष्ण : वाङमयदर्शन :प्रा. वा. ल. कुलकर्णी (पृष्ठ ४२) ३. सामाजिक नाटके (प्रस्तावना) : डॉ. वि. पां. दांडेकर ४. मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङमय : श्री. ना. बनहट्टी (पृष्ठ १३३-१३४)