पान:अभिव्यक्ती.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चार

'श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या नाटकातील सामाजिकता'
 कोल्हटकरांच्या नाटकातील सामाजिकतेसंबंधी विचार करीत असता मुख्यतः त्या संदर्भात दोन प्रश्न उद्भवतात.
 (१) कलाकृतीला खऱ्या अर्थाने 'सामाजिक कलाकृती ' असे केव्हा म्हणता येईल ? (२) कोल्हटकर खऱ्या अर्थाने 'सामाजिक नाटक ' कितपत लिहू शकले ? या प्रश्नांच्या आधारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यात प्रस्तुत विषयाचे विवेचन अंतर्भूत होईल.
कलाकृती आणि सामाजिकता  कोणत्याही कलाकृतीत कलावंत भावानुभवांच्या. आकृतिबंधाचा शोध घेत असतो. एखादा तत्त्वविचार किंवा कोणताही सामाजिक, राजकीय स्वरूपाचा विचार कलाकृतीतून अभिव्यक्त होणाऱ्या भावनात्मक अनुभवाशी संबद्ध असतो. कलात्मक आशय असे म्हटल्यानंतर मग त्यातून सर्व प्रकारचे विचार सूचित होऊ मात्र त्या विचारांना विचार म्हणून कलाकृतीत वेगळे स्थान असत नाही, तर सूचित होणारा विचार त्या अनुभूतीचा एक अपरिहार्य भाग असतो. मग ह्या कलाकृत्यंतर्गत विचारांचे स्वरूप 'सामाजिक', 'राजकीय' वा अन्य प्रका- रच्या वर्णनात्मक संज्ञा. ( discriptive terms ) वापरून उल्लेखिले जाते, मूल्यात्मक अर्थ येथे अभिप्रेत नसतो.
 'सामाजिक कलाकृती ' नित्याच्या सुपरिचित अशा जीवनाचेच चित्र असते. विशिष्ट समाजजीवनात निर्माण झालेली विषमता, अन्याय, दंभ, कुचंबणा इत्यादीं- मुळे अगतिक झालेल्या मानवी जीवनाचे चित्रण तीत अपरिहार्यपणे झालेले असते. या सामाजिक परिस्थितीचे अतिशय गंभीर स्वरूपाचे आकलन त्या कलावंताला होणे आवश्यक असते. एका अत्यंत कठोर वास्तवाचे दर्शन त्याला घडवावे लागते. शकतात.