पान:अभिव्यक्ती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरंभीचे मराठी नाट्यवाङमय / १३

 अनुवाद वा भाषांतरे करीत असताना साधारणपणे रोमँटिक मेलोड्रेमिक व फँटसीयुक्त नाटके, त्याचप्रमाणे ज्यात संविधानकांची गंमत किंवा गुंतागुंत आढळते अशाच नाटकांचा अनुवाद होणे सोपे जाते. व आकर्षकही ठरते. शेक्सपिअरच्या बहुतांश नाटकांत वरील गुण असल्याकारणाने त्याचे अनुवाद आपल्याकडे विपुल प्रमाणात झाल्याचे आढळते.
'बुफिश' नाटकांची परंपरा  बुकिश नाटक हे शेक्सपिअरच्या परिणामातूनच जन्माला आले आहे. मराठी संगीत नाटकांचा अवतार होण्यापूर्वीचे हे पर्व. अर्थात ही पाश्चात्य परंपरा होती. श्री. ना. बनहट्टी ह्यांच्या मते " 'दुसरा मोठा प्रगतीचा टप्पा बुकिश नाटकांचा होय. येथून खरी नाट्यवाङमयाची सुरुवात." त्यांचे हे मत सहज मान्य करता आले असते. पण आपल्याकडे खऱ्या अर्थाने अनुकरण झालेच नाही, झाले ते भ्रष्टानुकरणच.
 या बुकिश नाटकांचे-इंग्रजी रूपांतराचे हे पहिले प्रयत्न म्हणून महादेवशास्त्री कोल्हटकर यांचे ऑथेल्लो (१८६७); का. गो. नातू यांचे विजयसिंग (१८७२); वी. ज. कीर्तने : टेंपेस्ट ( १८७५ ); बजावा प्रधान : भ्रांतिकृत चमत्कार (१८७७); वि. मो. महाजनी : 'तारा' (१८७९) इत्यादी नाटके उल्लेखिता येतील.
शेक्सपिअरचे जबरदस्त आकर्षण  'यापुढे धांगडधिंगा आता खपणार नाही' नव्या पिढीच्या अपेक्षा व्यक्त- विणारा हा निबंधमालाकाराचा अभिप्राय निश्चितपणे लक्षात घेण्याजोगा आहे. भाषां- तरित नाटकांची शाखा पल्लवीत होत असतानाच परभाषेतील नाटकांची भाषांतरे करण्याच्या बाबतीत मराठी नाटककारांचा शेक्सपिअरच्याच नाट्यकृतींकडे विशेष ओढा असलेला आढळून येतो. सुशिक्षित नाटककारांचे लक्ष शेक्सपिअरच्या मराठी- करणाकडेच या काळात जास्त लागलेले होते. शेक्सपिअरच्या 'टेमिंग ऑफ दि श्रू' याचे प्रो. वा. वा. केळकर कृत 'नाटिका' हे रूपांतर; यानंतर केळकरांचे 'अंटनी व क्लिओपात्रा' याच्या आधारे 'वीरमणी व शृंगारसुंदरी' हे रूपांतर किंवा रंजितरंजक नाटकमालेचे संपादक श्री. बेलसरे यांनी शेक्सपिअरच्या जास्तीत जास्त नाटकांच्या मराठी प्रतिकृती तयार करण्याच्या बाबतीत स्पृहणीय कर्तबगारी केली. शेक्सपिअरच्या नाटकाची एक मालाच काढून तीतून भाषांतरे 'मराठी रसिकाला मूळरस अविकृत स्वरूपात देण्याच्या उद्देशानेच त्यांनी सादर केली.
बुकिश नाटकाचे स्वरूप  तथापि रसरशीत जिवंत असे रूप ह्या बुकिश नाटकांना प्राप्त होऊ शकले नाही. ही नाटके खऱ्या अर्थाने लोकांच्या मनाची पकड घेऊ शकली नाहीत. केवळ
.