पान:अभिव्यक्ती.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आरंभीचे मराठी नाट्यवाङमय / ११

जात नव्हता. अभिनवतेचा व अभिनयाचा अभावच जाणवत होता. या रंगभूमीचे फारसे परिवर्तन होऊ शकले नाही.
मराठेशाहीच कारणीभूत  ह्याला कारण मराठेशाहीत विविध कलांना स्थैर्य प्राप्त करून देणारे राज्यच अस्तित्वात आले नाही, आणि मराठेशाहीच्या अस्ताबरोबरच अनेक खास मराठी परंपराही लुप्त झाल्या.
 यावेळी महाराष्ट्राच्या धर्मपीठात नैतिक शुद्धता नांदत होती. परमेश्वर ही सर्वांची माऊली होती. उत्तान, शृंगारिक मधुराभक्तीचे नाते त्यांनी परमेश्वराशी लावले नव्हते.
 कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, दशावतारी खेळ, लळित यांशिवाय गोंधळी भराडी हेच या प्राथमिक स्वरूपाच्या नाट्याचा आविष्कार करीत असे. भारुडातूनच काही अंशी जन्मलेल्या 'लावणी' वाङमयातूनदेखील विविध प्रकारचे संगीत, नृत्य व नाट्य आविष्कृत झालेले आहे. हा काळ समाजजीवनातील विकृतीचा काळ होता. कलांच्या संदर्भातदेखील हीच परिस्थिती होती. 'ठुमरी'च्या परिणामातून जन्मलेली 'बैठकीची लावणी' जिच्यात बतावणीलाच खरेखुरे महत्त्व असते तीही लिहिली गेली. याच कालखंडात ‘वग' सादर केले जाऊ लागले. आख्यानपर कथा पद्यातूनच लिहिल्या गेल्या. नित्यनूतन असे रूप वगातून सादर केले जाई. अनेक दृष्टीने अत्यंत रसरशीत, जिवंत व उत्स्फूर्त असा हा कलाप्रकार होता. महाराष्ट्रात पूर्वीपासूनच रूढ असलेल्या Make-belief च्या प्रकारातूनही सकस असे नाट्य सादर केले जात होते. 'Make-belief' च्या तंत्राचे सामर्थ्य व वेगळेपण
 याच सुमाराला मराठी नाट्य व रंगभूमीच्या क्षेत्रात एक नवा वाद निर्माण झाला. बुद्धिप्रामाण्यवादी (rationalist) वर्ग केवळ इंद्रियगम्य वास्तववादालाच प्रमाण मानीत असे. अभिरुचीच्या पातळीतील या बदलामुळे Make-belief चे प्रामाण्य त्यांना पटणे शक्यच नव्हते. शिवाय केवळ मनोरंजनासाठी जन्मलेल्या 'तमाशा' या प्रकारातून खरेखुरे नाट्य आविष्कृत होऊ शकत नाही, असे त्यांना वाटले. अपरिहार्यपणे हा वर्ग पौर्वात्य व पाश्चात्य नाटयवाङमयाकडे वळला. Make-belief हा एक समर्थ नाट्याभिव्यक्तीचा प्रकार हा समाज समजू शकत नव्हता, असे नाइलाजाने म्हणणे क्रमप्राप्त ठरते. 'कल्पना करा की आपण द्वारकेत आलो' अथवा 'आपण जंगलात, राजवाड्यात जाऊ' असे म्हणून रंगमंचावर नुसत्या फेऱ्या मारल्या तरी खरोखरच संपूर्ण दृश्य बदलल्याची जाणीव होई. प्रेक्षकही समरस होत असत.
 निदान आज तरी आपण या Make-belief च्या तंत्राचे सामर्थ्य व वेगळेपण मान्यच केले पाहिजे. 'तमाशा' च्या या रंगभूमीत भाविक, आध्यात्मिक, धार्मिक, तरुण या सर्वच प्रकारच्या लोकांना स्थान व आव्हान होते. रंगाच्या अनेक