पान:अभिव्यक्ती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साचा:Rightतीन आरंभीचे मराठी नाट्यवाङ्मय : काही विचार  मराठी नाट्यवाङमयाच्या प्रारंभाचा विचार करीत असताना प्रामुख्याने जाणीव होते ती खंडित झालेल्या नाट्यपरंपरेची! एका दीर्घ कालखंडात ही परंपराच संपुष्टात आली होती. देशी भाषेमधून नाटक हा वाङमयप्रकार जणू नष्टच झाला होता. १०.व्या, ११ व्या शतकात नाटक लिहिलेच गेले नाही; असे आढळते.
इंग्रजी अमदानीतच नाट्यनिर्मिती  यानंतर थेट १९ व्या शतकात म्हणजे इंग्रजी अमदानीतच नाट्यनिर्मिती होऊ लागली. ही निर्मिती इतकी प्रखर झाली की जवळ जवळ नाटयेतर सर्व वाङमयप्रकार या नाटकांनी झाकाळून गेले. हा अलिखित नियमच म्हणावा लागेल. ज्या वेळी एका वाङमयप्रकारामध्ये चैतन्य संचारलेले असते त्या वेळी आपोआपच अन्य वाङमयप्रकार त्यामानाने कमी गतीने विकसित होत असल्याचे आढळते.
खास मराठी परंपरेचा अभाव  याही काळात टकांवरील खास मराठी परिणाम लुप्त झालेला होता असेच म्हणावे लागते. संस्कृत नाट्यपरंपरा व इंग्रजी-पाश्चात्यांची नाट्यपरंपरा या दोन प्रबळ व प्रभावी परंपरेच्या परिणामांतून मराठी नाटक जन्माला आले. मराठीची खास अशी जी एक परंपरा लुप्त झाली होती ती थेट पुन्हा विसाव्या शतकाच्याही पाच दशकांनंतर जाणवू लागली आहे.
 'लळिताची' परंपरा ही खास मराठी परंपरा होती. आणि या दृष्टीने पाहिले असता असे आढळते की नाट्याचा जन्म हा धार्मिक विधीतूनच झालेला आहे. (ग्रीक ट्रेजडी, नाट्यशास्त्र (भरतमुनी ) यातून हेच दिसते.)
 या सुमारास कोकणात दशावतारी खेळांना फार महत्त्व होते. भोळ्या, भाबड्या व धार्मिक वृत्तीच्या प्रेक्षकांना देवाचे दर्शन या सोंगांतून घडविले जाई. अर्थात ही प्राथमिक अवस्थेतील मराठी रंगभूमी होती. त्यात अभिनयाला फारसा वाव दिला