पान:अभिव्यक्ती.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. कृ. कोल्हटकरांचा रसविचार / ९

समान पातळीवर आणून मगच रसास्वाद घेतो. उदा:- ‘अर्जुन' ही वर्ण्यव्यक्ती

स्वश्रेष्ठ पण त्याच्या वीरत्वाचा अनुभव घेताना त्याला आपण विषय श्रेष्ठाहून विषय समानावर आणीत असतो; किंवा वर्ण्यव्यक्ती 'सुधाकर' रसिकांच्या भूमिकेपेक्षा कनिष्ठ म्हणून तो कनिष्ठ दर्जाचा. मात्र त्याला आपल्या पातळीवर आणूनच करुण- रसास्वाद घेणे शक्य होईल. (म्हणूनच करुण रस हा मिश्र व अंतर्मुखदृष्टिमूलकमध्ये समाविष्ट होतो.)
 वर्ण्यव्यक्ती व रसिक नाते हेच खरे प्रमुख नाते, पण इथे श्रीपाद कृष्णांनी वेगळेच 'नाते' गृहीत धरले आहे. रसिक व्यक्तीचे' वा ' स्वतःच्या मनातील भावानुभव' आस्वादितो म्हणून काही रस बहिर्मुख व अंतर्मुख बनतात. मराठी रसविचारात कोल्हटकरांचे मराठी समीक्षेतील हे वर्गीकरण मार्मिक, उद्बोधक व अभ्यसनीय असले तरी मूल्यवान ठरत नाही तर संस्कृत साहित्य शास्त्रातील ' अलंकार शास्त्रा'च्याच जातीचे ठरते.