पान:अभिव्यक्ती.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८) अभिव्यक्ती  श्रीपाद कृष्णांनी काव्यगत व्यक्ती व रसिक यांच्या नात्यावर आधारित वर्गी- करण केले आहे. काव्यास्वाद घेताना काव्यगत व्यक्तींच्या ठायी जी भाववृत्ती निर्माण होते, त्याच प्रकारची काव्यवृत्तीही निर्माण होते. म्हणून खालील तीन गटांत त्यांनी 'रसविभागणी केली आहे.
 (१) विषय श्रेष्ठ, ( २ ) विषय समान, ( ३ ) विषय कनिष्ठ. वर्ण्यव्यक्ती व रसिक यांच्या संबंधांवर हे अवलंबून असले तरी वर्ण्यव्यक्ती आणि रसिक यांचा हा शोध काव्यदृष्ट्या मौलिक ठरत नाही. 'मराठी वाङमयातील विशेष व त्याचे उगम या व 'विदर्भ वीणा' च्या प्रस्तावनेत हे 'रसांचे एक नवीन वर्गीकरण' दिलेले आहे.

रस । शांत शांतेतर शुद्ध (बहिर्मुखदृष्टिमूलक) मिश्र (अंतर्मुखदृष्टिमूलक) । सुखद व श्रेष्ठविषयक (वीर) दुःखद व कनिष्ठविषयक (करुण) विषय श्रेष्ठ विषय समान विषय कनिष्ठ सुखद दुःखद (अद्भुत) (भयानक) सुखद (शृंगार) दुःखद (रौद्र) सुखद दुःखद (हास्य) (बीभत्स)  रसामध्ये त्यांनी शांत व शांतेतर असे दोन गट कल्पून अंतिम परिणाम निर्वेद तो शांत रस मानले आहे. या संदर्भात प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या मताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. “ जीवनाच्या द्वंद्वात्मक जाणिवेतून येणाऱ्या विविध अनुभूतींचा प्रत्यय घडवू पाहाणाऱ्या इतर रसांपासून निद्वंद्व स्थितीचा प्रत्यय घडविणाऱ्या शांत रसाला वेगळा करण्यात कोल्हटकरांनी मोठी मार्मिकता व्यक्त केली आहे."२ शिवाय शांतेतरमध्ये शुद्ध आणि मिश्र असे दोन गट कल्पिलेले आहेत याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रसास्वाद घेताना तो विषय नेहमी
२. श्रीपाद कृष्ण : वाङमय-दर्शन (पृ. १६)