पान:अभिव्यक्ती.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ / अभिव्यक्ती ' मूळ ओळ अंतरीची ' संतांनी जे जे काही लिहिले त्यामाग अस्सल अनुभूती होती. एक जिवंत आणि रसरशीत अनुभव विश्व होते. म्हणूनच श्रेष्ठ दर्जाच्या अनुभवाला साकार करणारे श्रेष्ठ साहित्य ठरते. 'अनुभवा आले अंगा । ते या जगा देतसे ।। ' संतांनी जे लिहिले ते मनापासून ! परमेश्वर भक्तीच्या उदात्त प्रेरणेने व्याकूळ होऊन ! संतसाहित्यातील भावना अकृत्रिम, स्वाभाविक होत्या. संतांचेच बोल बोलके ठरतात. ‘तुका म्हणे झरा । आहे मूळचाचि खरा.' जे मनाला पटले, ज्याचा ध्यास लागला तेच त्यांनी लेखनविष्ट केले. आणि हे सारे आपोआप साध्य झाले. 'अंतरीचे धावे स्वभावे वाहेरी । आवरीता परी आवरेना ।' अशी स्थिती झाली. लोकमान्य टिळकांनीच म्हटलेले आहे की ' जे जे उत्कट ते ते सारे श्रेष्ठ आहे. आणि जे उत्कट नाही ते क्षुद्र आहे' या दृष्टीने संतसाहित्य श्रेष्ठचं ठरते. मनाच्या भावोत्कट अवस्थेतील बोल संतसाहित्य उत्स्फूर्त आहे. त्यात भावनेची पराकोटीची उत्कटता पाहावयास मिळते. या संतांचा एकेक अभंग म्हणजे त्यांच्या अंतःकरणाची एकेक ऊर्मी आहे. ' श्रेष्ठ अनुभूतीला शब्दबद्ध करणारे साहित्य श्रेष्ठ' ही भूमिका लक्षात घेतली तर संतसाहित्याचे वाङमयीन मूल्य लक्षात येते. त्यांत श्रेष्ठ अनुभूती आहे. काव्यात्मकता आहे; म्हणून कलात्मकता आहे असे म्हणता येते. वस्तुतः शब्दरूप प्राप्त करून देण्यास कठिण असा अनुभव संतांनी शब्दांतून यशस्वीपणे अभिव्यक्त केला. म्हणूनच ज्ञानेश्वर चिंतनशील कवी ठरतात आणि त्यांची ज्ञानेश्वरी श्रेष्ठ प्रतीचा काव्य ग्रंथ ! या ग्रंथातच त्यांनी 'बोली अरूपाचे रूप दाविले' प्रमेय रुचीस आणले. ज्ञानेश्वरी ही मराठीतील श्रेष्ठ दर्जाची वैचारिक कविता आहे. विचारांना नुसते विचार म्हणून काव्यात न आणता 'विचारानुभवाच्या ' स्वरूपात संवेद्य बनवून तुकारामांनी ते अभंगांत आणले म्हणून तुकारामांची कविता ही श्रेष्ठ दर्जाची वैचारिक कविता ठरते, तर नामदेव, जनाबाईची कविता ही मराठीतील विशुद्ध भावकविता आहे. संताचे अनुभवधन याचे मूळ आहे. " तात्पर्य, संतसाहित्यात ज्ञानानुभव आहे, विचारानुभव आहे, भावानुभव आहे, त्यात नाट्य आहे, काव्य आहे, वैविध्य आहे. संतांच्या संपन्न, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या कलात्मक आविष्काराने या साहित्याची कलात्मक पातळी अबाधित राखली आहे. प्राचीन मराठी वाङ्मयाचे दालन यामुळेच समृद्ध झाले. म्हणूनच या महाराष्ट्रीय संतांनी केलेल्या सामाजिक कार्याप्रमाणेच वाङमयीन कार्याचेही मोल विशेष लक्षणीय आहे. 30 30 300