पान:अभिवादन (Abhivadan).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


५२ । अभिवादनमला जाणतो त्याचे सर्वश्रेष्ठ हित होते. मी तीन तोंडांच्या त्वष्ट्रयाला ठार मारले. औस्माघांना लांडग्यांच्याकडून खाववले. अनेक तह तोडले. पौलोम आणि कालकूट यांचा नाश केला, तरीही माझे काहीच वाकडे झाले नाही. म्हणून जो मला जाणतो त्यांचे अकल्याण होत नाही. मग तो मातृघ्न असो, पितृघ्न असो, भृणहत्या करो, दरोंडा मारो त्याचे काहीच वाकडे होत नाही. (कौशितकोपनिषद अ. तिसरा). 'मला शरण ये आणि लढ' असे सांगणारा कृष्णही नेमके हेच वेगळ्या पद्धतीने म्हणत होता. मग मूळच्या इंद्राच्याच तोंडी हे तत्त्वज्ञान का घातले गेले नसावे ? याचे कारण असे की, वैदिक वर्णनाच्या योगाने इंद्राला रेखीव आकार आलेला होता. नव्या गरजा, राजा हा पूर्ण स्वामी मानणान्या त्याच्यावर संपूर्ण निष्ठा मागणाऱ्या होत्या. त्यासाठी धर्मात एका सर्वश्रेष्ठ परिपूर्ण सर्वव्यापी देवतेची गरज होती. वैदिक ग्रंथांनी रेखीव केलेला इंद्र हे कार्य करू शकला नाही. म्हणून अनिश्चित आकार असणाऱ्या कृष्णात सर्व संप्रदायांचे व सर्व गरजांचे एकीकरण क्रमाक्रमाने करण्यात आलेले दिसते.
 भारतीय संशोधकांना एक बाब नेहमी घोटाळ्यात पाडते, ती म्हणजे ज्या व्याधाने कृष्णाला बाण मारला तो कृष्णाचाच भाऊ होता असा उल्लेख परंपरेत सापडतो. इंद्र आणि कृष्ण या दोघांचेही मूलभूत पाप मातृसत्तेचे नियम तोडणे हे असावे. गोकुळ हे पशुपालनाच्या अवस्थेत असल्यामुळे पितृसत्ताक असले, तरी वृंदावन मातृसत्ताक होते. पुढे ही वृंदा तुळस झालेली आहे. जिच्याशी दरसाल कृष्णाचे लग्न होते. मुळात हा, दरसाल नवा पुरुष मिळविणारा मातृसत्तेतील विधी होता. ग्रीक हॅरीक्लेसप्रमाणे आपल्याकडील कृष्णानेही मातृसत्तांच्या परंपरा तोडलेल्या असाव्यात. हॅरीक्लेसने ज्याप्रमाणे पाणसर्प पराभूत केला आहे तसे 'कृष्णाने कालियामर्दन केले आहे. पाणिनीच्या काळाच्या सुमारासच कृष्ण आणि अर्जुन यांची गणना पुरुषोत्तमांत होऊ लागलेली होती. पुढे चालून कृष्णाला शृंगांच्या काळानंतर 'भागवत'ही म्हणू लागले. जे मुळात गौतम बुद्धाचे विशेषण होते. कृष्णाविषयी अजून एक विचारात घेण्याजोगी अशी गोष्ट आहे की, त्याचे प्रमुख हत्यार चक्र हे होते. वैदिक वाङमयात हे हत्यार आढळत नाही. बुद्धोत्तर काळातही हे हत्यार आढळत नाही. पण इ. स. पूर्व ८०० च्या सुमारासच्या मिओपूर येथील एका गुहेत चक्रधारी योद्धा रथी म्हणून दाखविलेला आढळतो. तेव्हा चक्र हे हत्यार वेदोत्तर व बुद्धपूर्वकाळात आले आणि गेले असावे. वृष्णींचे राज्यही कृष्णाबरोबर संपलेले दिसत नाही. कारण इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात वृष्णींचे एक नाणे सापडलेले आहे. त्या अर्थी कृष्णाविषयीचा महाभारतात आलेला आढावा बराच जपून स्वीकारला पाहिजे ही गोष्ट उघड आहे. गीतेतील कृष्णाने दर युगात 'धर्मस्थापनेसाठी आपण अवतार घेऊ' अशीही घोषणा केलेली आहे. अनेक देवतांच्या पुनः

_ - --- - --- - . . . . - - - --- -- - - -...-...-- ---...