पान:अभियांत्रिकी.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६) शाळेतील फर्निचरसाठी सनमायका चिटकवणे. (७) विळी तयार करणे. (८) डायनिंग टेबल तयार करणे. अपेक्षित कौशल्य : (१) प्लायवूड योग्य मापात कापणे. (२) सनमायका योग्य मापात कापणे, (३) हत्यारांचा वापर करता येणे (हातकरवत सेंटर पंच) (४) रंधकाम करता येणे. (५) सनमायका चिटकवणे. (६) मापन करता येणे. (७) योग्य मापात जोडणी करणे. (८) फेव्हिकॉल लावणे व चुका ठोकता येणे. शिक्षक कृती :(१) सनमायका वप्लायवूडविषयी माहिती द्या. (२) सनमायका कसा चिटकवावा ते शिकवा. (३) योग्य मापात पेन्सिलने आखणी कशी करावी ते दाखवा. (४) हातकरवतीने कापकाम कसे करतात ते शिकचा. प्रात्यक्षिक : सुतारकाम - सनमायका बसविणे. अपेक्षित कौशल्ये: १) प्लायवूड कापणे. २) सनमायका कापणे. ३) सनमायका चिकटवणे. साहित्य : प्लायवूड, सनमायका, तार चुका, फेव्हिकोल इ. साधने : स्टील टेप, गुण्या इ. हत्यारे : पेन्सिल, हातकरवत, सेंटर पंच/सनमायका कटर, हातोडी, अंबूर, रंधा इ. कृती : (१) दिलेल्या मापानुसार प्लायवूडवर काटकोनात आखणी करून घ्या. (२) हातकरवतीच्या साहाय्याने प्लायवूड कापून घ्या. (३) प्लायवूडच्या आकारमानानुसार सनमायकावर पेन्सिलने आखणी करा. (४) सेंटर पंचच्या साहाय्याने त्यावर ३ ते ४ वेळा रेषा ओढा. (५) रेषा मारलेली बाजू प्लायवूडच्या कडेवर धरून खाली दाबा. सनमायका आपोआप तुटेल. (६) प्लायवूडच्या सर्व बाजूंनी काठावर ३ सेमी अंतरावर अर्ध्या जातील अशा बेताने चुका ठोका. (७) प्लायवूडच्या वरच्या व सनमायकाच्या खालच्या पूर्ण पृष्ठभागावर फेव्हिकोल लावा. (८) प्लायवूडच्या एका बाजूला सनमायका टेकवा व त्यावर दाब द्या. (९) अशाप्रकारे हळूहळू सनमायका थोडा थोडा टेकवत चिकटवा. (१०) काठावर ठोकलेल्या चुका, सनमायकावर दाब येईल अशारितीने आत वाकवा. (११)प्लायवूडवर सर्व ठिकाणी वजन ठेवा. (१२) साधारणपणे १२ तासांनी सनमायकावरील वजन काढून घ्या. (१३)प्लायवूडच्या कोडीवर ठोकलेल्या चुका काढून घ्या. (१४)प्लायवूडच्या चारही कडांवर रंधा मारा. दक्षता :(१) प्लायवूड कापताना त्याखाली उंच ठोकळा ठेवा. (२) सनमायका प्लायवूडपेक्षा किंचित मोठा ठेवा. (३) सनमायकावर सेंटर पंचने मारलेल्या रेषा एकावर एक येत आहेत, याची खात्री करा, (४) सेंटर पंच टोकदार असल्याची खात्री करा. (५) सनमायका तोडताना त्याची प्लायवूडवरील बाजू दाबून ठेवा. (६) फेव्हिकोल लावल्यावर वेळ न घालवता प्लायवूडला ताबडतोब सनमायका चिकटवा. (७) सनमायका वप्लायवूड एकमेकांना चिकटवताना हवेची पाकळी राहणार नाही, याची काळजी घ्या. शिक्षक कृती : (१) कापकाम करताना हातकरवत कशी वापरावी ते शिकवा. (२) हे तंत्र वापरून टेबलच्या टॉपला सनमायका कसा लावता येईल ते सांगा. (३) या तंत्राचा वापर करून सनमायका बसवलेले प्लायवूड भिंतीला लावून डायनिंग टेबल कसे बनवे ते सांगा. ५०