पान:अभियांत्रिकी.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करणी ठेपीचा सांधा (५) मा0 मानशीवर माशाच्या लाकडाला आकार देऊन झाल्यावर लाकूड घासून साफ करण्यासाठी ही कानस वापरतात. लाकडी वस्तूचे भाग जोडण्यासाठी निरनिराळे सांधे किंवा जोड तयार करावे लागतात. दोन लाकडे शेजारी-शजारी ठेवून बनवलेल्या सांध्यांना ठेपीचे सांधे तर दोन लाकडे एकावर एक ठेवून बनवलेल्या सांध्यांना खापीचे सांधे म्हणतात. (७) फ्रेंच पॉलिशमुळे लाकडाचे हवामानापासून संरक्षण होते. त्यामुळे लाकूड दीर्घकाळ टिकते व सुशोभित दिसते. स्वाध्याय : (१) जॉब करताना केलेल्या कृतीचा फ्लो चार्ट तयार करा. (२) काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना अर्धउघडा खापीचा सांधा लिहा. बंद अर्धडवरीचा सांधा (३) पुस्तक-ठेवणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा बाजारभाव पहा. (४) घेतलेल्या कच्च्या मालाची किंमत, मजुरी, अप्रत्यक्ष खर्च इत्यादीच्या आधारे पुस्तक-ठेवणीची एकूण किंमत काढा. संदर्भ : (१) शिक्षक हस्त पुस्तिका, इयत्ता ९ वी (V2), (यंत्र अभियांत्रिकी मूलतत्त्वे) पान नं.१७९ ते १८३ (२) शि.ह.पु., इयत्ता ९ वी (V1), पान नं.१४३ ते १४५. दिवस : चौथा प्रात्यक्षिक: सुतारकाम-सनमायका बसविणे. प्रस्तावना : सुतारकामामध्ये लाकडी वस्तू तयार करताना त्या अधिक काळ कशा राहतील, यासाठी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते. लाकूड किंवा प्लायवूड किटकांमुळे खराब होऊ नये, त्यांचा कुजण्यापासून बचाव व्हावा, लाकडाचे आयुष्य वाढावे म्हणून त्यावर संरक्षक म्हणून सनमायका चिटकवावी लागते. यामुळे लाकडाच्या वस्तुची शोभा वाढते व अधिक आकर्षक बनते. सनमायका बसविण्याचे कौशल्य शिकुयात. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकासाठी लागणारा सनमायका, प्लायवूड, फेव्हीकॉल, तार, चुका इ. एकत्र जमा करणे. (२) लागणारी साधने व हत्यारे व्यवस्थित आहेत का ते पाहून उपलब्ध करून ठेवा. (पेन्सिल, सेंटर पंच, टेप, सनमायका कटर, हातकरवत, हातोडी, रंधा, अंबुर (पक्कड) इ.) (३) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य व साधने टेबलवर मांडणी करून ठेवा. (४) विद्यार्थ्यांचे ३ गट पाडा, (५ विद्यार्थ्यांचा एक गट) गटामध्ये कामाची वाटणी करून द्या. (५) सनमायका चिटकवल्यावर त्यावरती ठेवण्यासाठी वजन म्हणून वस्तू आणून ठेवा. उपक्रमांची निवड: (१) पाट तयार करणे. (२) चौरंग तयार करणे. (३) टेबल तयार करणे. (४) पॅड तयार करणे, (५) स्विच बोर्ड तयार करणे.