पान:अभियांत्रिकी.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपणास हे माहीत आहे का? (१) जास्त रुंदीचे लाकूड दुर्मिळ असल्याने त्याऐवजी प्लायवूड वापरतात. खोडाचे पापुद्रे एकावर एक चिकटवून प्लायवूड तयार करतात. साधारणपणे ६ मि.मी. पासून १८ मि.मी.पर्यंतचे प्लायवूड मोठ्या प्रमाणात वापरले जाते. वॉटरप्रुफ प्लायवूडसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. (२) नक्षी छापलेल्या कागदावर प्लॅस्टिक रेझिनचे थर देऊन सनमायका तयार करतात. त्यामुळे ते गुळगुळीत व धुण्यास योग्य होते. काही वेळेस सनमायकाऐवजी फोरमायका वापरतात. फोरमायका सनमायकापेक्षा जाड असतो. शिवाय त्याचा पृष्ठभाग खरबरीतसुद्धा असतो. (३) लाकूड कापण्याच्या करवतीचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदा. हँड सॉ, टेनन सॉ, कंपास सॉ इ. (४) जास्त खोलीचे कापकाम करण्यासाडी हँड सॉ वापरतात. (५) हातोडी घडीव पोलादापासून तर अंबूर, पक्कड यासारखी साधने ओतीव पोलादापासून बनवलेली असतात. (६) खिळे काढण्यासाठी अंबूरचा उपयोग करतात. (७) सुतारकामात लाकडाचा पृष्ठभाग सपाट करण्यासाठी रंधा वापरतात. रंधा लाकडी किंवा लोखंडी असतो. रंध्याचे खोड, पाते, पाचर इ. मुख्य भाग असतात. पार्टिकल बोर्ड : लाकडाचे बारीक कण तयार करून ते अत्यंत उष्ण अशा वाफेत शिजवतात व लगदा तयार करतात. या लगद्यात सरस किंवा रेझिनसारखा चिकट पदार्थ ठराविक प्रमाणात मिसळण्यात येतो. या चिकट लगद्यावर यंत्राच्या साहाय्याने पुष्कळ दाब देऊन त्याचे तक्ते तयार करतात. या तक्त्यांना हवे ते आकार दिल्यानंतर ते वाळवतात. या तक्त्यांची जाडी व टेक्श्चर जरुरीप्रमाणे विविध प्रकारचे मिळू शकते. ब्लॉक बोर्ड : चौरस लाकडी पट्ट्या एकमेकांना जोडून त्याच्या पृष्ठभागावर दोन्ही बाजूने पातळ फळ्या चिकटवतात व ब्लॉक बोर्ड तयार करतात. लॅमिनेटेड बोर्ड : हे कृत्रिम लाकूड बोर्ड सारखेच तयार करतात. फक्त यात वापरण्यात येणाऱ्या लाकडी पट्टया या आयताकृती असतात. कृत्रिम लाकडाचे उपयोग : फर्निचर, दरवाजे, चहाची खोकी, घराची पार्टिशन्स, छते, रेडिओच्या कॅबिनेटस, शोभेच्या वस्तू इत्यादी तयार करण्यासाठी. मूल्यमापन : (१) कृत्रिम लाकूड वापरण्याचे फायदे सांगा. (२) कृत्रिम लाकडाचे प्रकार सांगा (३) प्लायवूड कसे तयार करतात ते सांगा. (४) कृत्रिम लाकडांचे उपयोग सांगा. उपघटक : लाकडाचे संरक्षण प्रस्तावना : संरक्षण म्हणजे रक्षण करणे. लाकडावर होणाऱ्या रोगापासून लाकडाचे रक्षण करणे म्हणजे लाकडाचे संरक्षण होय. लाकूड किटकांच्या प्रभावाने खराब होऊ नये, त्यांचा कुजण्यापासून बचाव व्हावा, लाकडाचे आयुष्य वाढावे म्हणून संरक्षक पदार्थाचा पातळ थर द्यावा लागतो. या पदार्थांना संरक्षक असे म्हणतात. लाकडाच्या वस्तूचे किटकांपासून तसेच वातावरणातील धूळ व वरचेवर हाताळणी करताना होणाऱ्या परिणामांपासून बचाव व्हावा म्हणून खालील पद्धतीने संरक्षण करतात, (१) पॉलिश काम (Polishing) (२) पेंटींग (Painting) (३) वार्निशिंग (Varnishing) (१) पॉलिश काम (Polishing) : लाकडाच्या वस्तुची शोभा वाढविण्यासाठी तसेच संरक्षणासाठी पॉलिशचा उपयोग करतात. ते बाजारात तयार विकत मिळते. ज्या लाकडी भागावर पॉलिश करायचे आहे ते लाकूड प्रथम घासकागदाने (Sand Paper) घासून पृष्ठभाग चांगला सफाईदार करून घ्यावा लागतो. त्यानंतर ज्या रंगाचे