________________
(३) बाभूळ : गुणधर्म : दाट सळांचे, तांबूस पिंगट रंगाचे, अतिशय मजबूत, कठीण, टणक व चिवट. उपयोग : शेतीची अवजारे, हत्यारांच्या मुठी, बैलगाड्या, तंबूच्या खुंट्या इत्यादी तयार करण्यासाठी. (४) आंबा : गुणधर्म : कठीण सळांचे, पिंगट रंगाचे, मध्यम मजबूत. उपयोग : स्वस्त फर्निचर, फळांचे खोके, खेळणी इत्यादी तयार करण्यासाठी. (५) लिंब : गुणधर्म : दाट व वेड्यावाकड्या सळांचे, चिवट, तांबूस रंगाचे, उग्र वासाचे. उपयोग : स्वस्त फर्निचर व इमारती कामात करतात. वरील लाकडांबरोबरच चिंच, खैर, देवदार, हलदू इत्यादी लाकडे सुद्धा सुतारकामात वापरतात. प्रात्यक्षिक : पुस्तक ठेवणी तयार करणे. अपेक्षित कौशल्ये :१. लाकूड कापणे, २. लाकूड रंधणे, ३. खाच पाडणे, ४. कूस बनविणे,५. जोडणी करणे साहित्य : लाकडी फळ्या, पिवळी माती, फ्रेंच पॉलिश, स्क्रू इ. साधने : ठिय्या, सुतारी शेगडा, मोजपट्टी, गुण्या, ड्रील मशीन, खतावणी इ. हत्यारे : करवत, रंधा, पटाशी, सड्या, हातोडी, ड्रील बीट, स्क्रू ड्रायव्हर, मार्फा कानस, पॉलिश पेपर. कृती : (१) प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या साधनांची व हत्यारांची माहिती घ्या. (२) शेगड्यात फळ्या पकडून दिलेल्या मापात करवतीने कापून घ्या. (३) नंतर ठिय्यावर फळ्या ठेवून त्यांचे दोन्ही पृष्ठभाग रंधून घ्या. (४) दोन्ही बाजूंच्या फळ्यांना करावयाच्या खाचेची (विधी) आखणी करा. (५) नंतर फळ्यांना पटाशी व सड्याच्या मदतीने खाचा पाडा. (६) ठेवणीच्या फळ्यांना कुसाची आखणी करा. (७) कुसे करवतीने कापून (८) कुसे छिद्रात बसवून घ्या. (९) सांध्यांमधून कुसे निघू नयेत म्हणून त्यांना स्क्रू बसवा. (१०) कुसाचा बाहेर निघालेला भाग मार्फाने घासून घ्या. (११) फळ्यांचे सर्व पृष्ठभाग पॉलिश पेपरने घासून घ्या. (१२) नंतर त्यावर पिवळी माती लावा. (१३) पुन्हा एकदा सर्व पृष्ठभाग पॉलिशपेपरने घासून शेवटी त्यावर फ्रेंच पॉलिशचे दोन-तीन हात द्या. दक्षता : (१) रंधकाम करताना रंधा जास्तीत जास्त लांबपर्यंत न्या. (२) खाच पाडताना प्रथम सळांना काटकोनात खाच मारा. खाच पाडताना फळी फुटणार नाही, याची काळजी घ्या. कूस खाचेपेक्षा किंचित मोठे कापा. नंतर मार्फाने घासून बसवा. (५) घासताना प्रथम रफ असते. स्मूथ करण्यासाठी पॉलिशपेपरचा वापर करा. (६) पॉलिश देताना धुळीचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. आपणास हे माहीत आहे का? (१) सुतारकामात २ फूट लांबीची लाकडी घडीची पट्टी वापरतात. तिच्या चार घड्या होतात. त्यामुळे ती सहजपणे खिशात बाळगता येते. (२) रंधताना फळीला आधार देण्यासाठी ठिय्या वापरतात. (३) लाकडाच्या लांबीच्या दिशेत समांतर रेषा मारण्यासाठी खतावणी वापरतात. (४) सुतारकामात सर्वसाधारण तोडकाम करण्यास पटाशी तर खाचा पाडण्यासाठी सड्या वापरतात ४८