Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

 (१) प्लॅस्टिक वेल्डींग (Plastic welding) (२) फ्युझन वेल्डींग (Fusion welding)
 वरील दोन पद्धतीमध्ये दोन प्रकारे वेल्डींग केले जाते.
(१) प्रेशर वेल्डींग : यामध्ये प्लॅस्टिक वेल्डींगचा समावेश होतो. (२) नॉन प्रेशर वेल्डींग : यामध्ये फ्युझन वेल्डींगचा समावेश होतो. या ठिकाणी प्रेशर न देता दोन पार्ट जोडले जातात. पण प्लॅस्टिक वेल्डींगमध्ये प्रेशर दिल्याशिवाय दोन पार्ट जोडले जात नाहीत. तसेच वेल्डींग प्रोसेसमध्ये धातू वितळण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने उष्णता मिळविली जाते यावरून वेल्डींगचा प्रकार ओळखला जातो. यासाठी वेल्डींग प्रोसेसचे वर्गीकरण खालीलप्रमाणे दिले आहे. क्लासिफिकेशन ऑफ वेल्डींग प्रोसेस : (Classification ofWelding Processes) वेल्डींग प्रोसेस प्लॅस्टिक वेल्डींग किंवा प्रेशर प्रोसेस (Plastic Welding or Pressure Processes) फ्युझन प्रोसेसेस (Fusion Processes) फोर्ज वेल्डींग (Forge Welding) रेझिस्टन्स (Resistance Welding) थर्मिट (Thermit Welding) आर्क (Arc Welding) (Gas Welding) स्पॉट (Spot) बट (Butt) सीम (Seam) मेटल (Metalarc) ॲटोमेटिक हायड्रोजन (Automi Hydrogen) कार्बन (Carbon) परकशन वेल्डींग (Percussion Welding) प्रोजेक्शन वेल्डींग (Projection Welding) (२) प्रेशर प्रोसेसेस वेल्डींग : (१) फोर्ज वेल्डींग (Forge Welding) : या जोडची माहिती ब्लॅकस्मिथी विभागामध्ये घेतली आहे. यामध्ये दोन पार्ट गरम करून त्यांची दोन टोके एकमेकांवर ठेवून ते दोन पार्ट ऐरणीवर ठेवतात आणि हॅमरच्या साहाय्याने ठोकून जोड पक्का करतात. हा जोड थंड झाल्यानंतर एकदम पक्का होतो. फोर्ज पद्धतीने जोड केला म्हणून या जोडला ‘फोर्ज वेल्डींग' असे म्हणतात. (२) आर्क वेल्डींग : यामध्ये कार्बन इलेक्ट्रॉड व धातुचे इलेक्ट्रॉड वापरून वेल्डींग करतात. ही पद्धत कमी खर्चाची आहे. मोठमोठ्या वेल्डींगसाठी उदा. पूल बांधणी, जहाज बांधणी याठिकाणी. आर्क वेल्डींग पद्धतीने काम करताना कोणती काळजी घ्यावी : (१) इलेक्ट्रॉडचा आकार व प्रकार यांची योग्य निवड करावी. (२) विद्युत प्रवाह व विद्युत दाब यांची योग्य जुळणी. (३) वस्तूपकडण्याची पद्धत. (४) वस्तू जुळवून घ्यायची पद्धत. (५) काम चालू करण्यापूर्वी सर्व कनेक्शन्स योग्य त्या ठिकाणी व घट्ट आहेत काय याची खात्री करून घेणे. (६) स्पार्क व प्रकाशापासून स्वतःचे व दुसऱ्या व्यक्तीचे संरक्षण होईल याची काळजी घेणे. १४