Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) स्ट्रिंगर बीडच्या साहाय्याने वेल्डींग पूर्ण करा. (५) चिपिंग हमरने स्लँग काढून वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. दक्षता व काळजी: (१) काम करताना अॅप्रन व हातमोजे यांचा वापर करावा. (२) सांधकामातील साधनांचा योग्य वापर करावा. (३) इलेक्ट्रोड जॉबच्या पृष्ठभागाशी ७०°-८०° कोन ठेवावा. वेल्डींग करत असताना हाताची हालचाल एकाच पद्धतीने व स्थिर रितीने करावी. त्यामुळे बीडस् सारख्या आणि सरळ येतील. कौशल्य संपादन :(१) सरळ रेषेत वेल्डींग करण्याचे कौशल्य आत्मसात करणे. विशेष माहिती : वेल्डींग : वेल्डींग विभागामध्ये एकाच धातुचे दोन तुकडे जोडताना त्या ठिकाणी उष्णतेचा उपयोग करून धातुचे दोन तुकडे एकमेकांस टेकवून ठेवले जातात व त्याच्या एकमेकांस भिडणाऱ्या टोकांचे ठिकाणी वेल्डींग इलेक्ट्रोड वितळवून जो सांधा जोडला जातो, त्यास 'वेल्डींग' असे म्हणतात. हे वेल्डींग मिश्रधातू किंवा दोन वेगवेगळ्या धातुचे तुकडे सुद्धा एकमेकांस वेल्डींग रॉडच्या साहाय्याने जोडता येतात. वेल्डींग इलेक्ट्रोड : आर्क तयार करण्यासाठी व लोखंडाच्या जोडामध्ये भर घालण्यासाठी इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. ज्या धातुंचा तोड करावयाचा आहे त्याच धातूपासून बनविलेला इलेक्ट्रोड वेल्डींगसाठी वापरला जातो. (१) वेल्डींग इलेक्ट्रोड अँड फ्लक्स : (Welding Rods and Fluxes) वेल्डींग कामामध्ये धातुचे दोन तुकडे जोडण्यासाठी धातूच्या कांडीचा उपयोग करतात. ही कांडी ज्या धातुवर जोड करावयाचा असेल त्याच धातुची वापरली जाते. म्हणजेच जोडकाम करण्याच्या ठिकाणी धातुची कांडी गॅसच्या मदतीने जरूर तेवढी ज्वाला निर्माण करून जोडाच्या ठिकाणी वितळवली जाते. या धातुच्या कांडीलाच 'वेल्डींग रॉड' असे म्हणतात. या वेल्डींगचा उपयोग कोणत्याही मशिनचे सुट्टे भाग किंवा लोखंडी कपाटे वगैरे जोडकाम करण्यासाठी करतात. वेल्डींगच्या साहाय्याने केलेली जोडणी ही चांगली आणि मजबूत होते. म्हणून मोठ्या आणि मजबूत कामासाठीच हे वेल्डिंग रॉड वापरतात. ज्यावेळी कमी ताकदीचे आणि ज्या धातुची उष्णताजन्य ताणांना विरोध करण्याची शक्ती कमी असते असे धातू जोडण्यासाठी सोल्डरींग चा वापर केला जातो. सोल्डर कमी तापमानाला वितळणारा मिश्र धातू आहे. तसेच या मिश्रणामध्ये कधी कधी बिस्मथ कॅडमिनियम हे धातू अगदी थोड्या प्रमाणात मिसळले जातात. याच मिश्रणाला 'कठीण सोल्डर' किंवा 'ब्रेझिंग' असे म्हणतात. या ब्रेझिंगमध्ये तांबे, जस्त ४:१ या प्रमाणात वापरले जाते. जोडावयाच्या धातुच्या कडा उत्तमरितीने साफ करणे, धातुवर होणारी गंजण्याची प्रक्रिया थांबविणे व असलेला गंज काढून टाकणे. यासाठी फ्लक्सची क्रिया करावी लागते. फ्लक्स हा धातू बिनविरोध वाहतो आणि वेल्ड पक्का बसतो. धातुच्या कडा चांगल्यारितीने स्वच्छ करण्यासाठी फ्लक्सचा वापर करावा लागतो. टीनचे पत्रे जोडण्यासाठी चरबी, मधमाशांचे मेण, राळ किंवा अल्कोहोल मिसळून पातळ केलेले झिंक क्लोराईड फ्लक्स म्हणून वापरतात. उष्णता निर्मितीचे साधन वापरून वेल्डींग केले जाते. त्यासाठी उष्णता कोणत्या प्रकारे मिळविली जाते, त्या ठिकाणी यंत्रसामुग्री कोणती, कामाच्या पद्धती कोणत्या व जोड भरावयाच्या धातुची पद्धत कोणती याची सविस्तर माहिती घ्यावयाची आहे. त्या कामासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते. (२) टाईप्स ऑफ वेल्डींग : वेल्डींग करण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत. १३