________________
(७. कामास सुरुवात करण्यापूर्वी अॅप्रन व हातमोजे घालावेत. (८) स्क्रिन किंवा गॉगलशिवाय आर्क पाहू नये. (९) काम करताना पायामध्ये बूट वापरावेत. (१०) मशिन गरम होत असल्यास ताबडतोब बंद करावे. (११) काम बंद करावयाचे असेल त्यावेळी मशिनचा विद्युत प्रवाह न विसरता बंद करावा. (१२) गरम धातुचे तुकडे इकडे तिकडे टाकू नयेत. (१३) वेल्डींग मशिन हे ज्या त्या कंपनीच्या सूचनेप्रमाणे वापरावे. (१४) विद्युत मंडळ पूर्ण करण्यासाठी अर्थिंग करणे आवश्यक आहे. (१५) वेल्डींग मशिन नेहमी मोकळ्या जागेत असावे. (१६) मशिन, सर्व साहित्य सामग्री व्यवस्थित असावी. वेल्डींग कामामध्ये कामाच्या आवश्यकतेप्रमाणे वरीलपैकी कोणतीही पद्धती वापरली जाते. पण वेल्डींग म्हटले म्हणजे बहुतेक गॅस वेल्डींग आणि इलेक्ट्रिकल वेल्डींग असेच समजतात. म्हणून वेल्डींगची बरीच कामे वरील या दोन प्रकारामध्येच केली जातात. म्हणून या प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम वेल्डींग कामासाठी आवश्यक असणारे साहित्य याची माहिती घेणे आवश्यक आहे. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ. ९ वी V1, पान नं.१२० ते १२२. दिवस : तिसरा प्रात्यक्षिकाचे नाव : सुतारकाम : हत्यारांची ओळख, धार लावणे व दिवड पाडणे. प्रस्तावना : आजच्या यांत्रिक युगात सुतारकामाचे विशेष महत्त्व आहे. कारण सुतारकामाचा कारागीर समाजाच्या तसेच कारखान्याच्या गरजा भागवत असतो. उदा. समाजाला पुष्कळ त-हेच्या लाकडी वस्तुंची गरज असते. कार्यालय, दुकान व घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या फर्निचरसाठी लाकडाचा उपयोग होतो. तसेच बांधकामासाठी लाकडाचा उपयोग होतो. अशा या लाकडावर काम करणाऱ्या कारागिरास सुतार म्हणून संबोधतात. या व्यवसायात अनेक प्रकारची कामे करताना विविध हत्यारे व यंत्रे वापरली जातात. प्रामुख्याने तोडणारी, कापणारी, रंधणारी, छिद्र पाडणारी आणि ठोकणारी हत्यारे वापरली जातात. या हत्यारांनी जास्त काम झाल्यास अथवा लाकाडाशी घर्षण मोठ्या प्रमाणावर झाल्यास यांची धार कमी होते किंवा ही हत्यारे बोथट होतात. या हत्यारांनी अधिक गतीने काम करण्यासाठी त्यांना धार लावणे आवश्यक आहे. म्हणून आपण सुरुवातीला सुतारकामामध्ये हत्यारांना धार लावणे व दिवड पाडणे या कौशल्यांचा अभ्यास करणार आहोत. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) आपल्या विभागात या प्रात्यक्षिकासाठी लागणारी साधने सुस्थितीत असल्याची खात्री करा. (२) ज्या हत्यारांना धार व दिवड लावायची आहे अशी हत्यारे वेगळी करा. (पटाशी, करवत, विळे इ.) आपल्याकडे हत्यारांना धार लावण्यासाठी निशाणा (ऑईनस्टोन), दिवड पट्टी, सॉ सेटींग प्लायर (पक्कड), त्रिकोणी कानस इत्यादी असल्याची खात्री करा. (४) विद्यार्थी संख्येनुसार गटाचे नियोजन करा. उपक्रमांची निवड : (१) इयत्ता नववीसाठी खालील उपक्रमासाठी हत्यारांना धार लावणे व दिवड पाडणे आवश्यक आहे. उदा. पाट, पॅड तयार करणे. स्वीचबोर्ड तयार करणे. १५ (३) आपल्यावर