पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ काव्यरत्नावली, संग्रह अत्यंत आवश्यक आहे. 'विविधज्ञानविस्तार, ' मासिकमनोरंजन ' इत्यादि मासिक पुस्तकांतून व कित्येक वृत्तपत्रां- नूनही आधुनिक मराठी काव्यें प्रसिद्ध होत आहेत. ही गोष्ट फार उपयुक्त व इष्ट आहे आणि ह्मणूनच मोठ्या संतोषाची आहे. तथापि मासिक पुस्तकें आणि वृत्तपत्रे यांच्यापेक्षां स्वतंत्र ग्रंथाला चिरस्थायित्व कांही अंशी अधिक असतें. अशा दृष्टीने 'काव्यमाधुर्य,' ' अर्वाचीन कविता, 76 'कुसुमगुच्छ, काव्यदोहन, ' अशांसारखे प्रयत्न जितके होतील तितके थोडेचं आहेत. शारदाप्रसादनमंडलाने याच दिशेनें प्रस्तुत अल्प प्रयत्न आरंभिला आहे. 2 कोणत्याही समाजांत जुन्याविषयी फार आदर असतो, व नव्याविषयी प्रायः औदासीन्य किंबहुना उपहासबुद्धि दिसते. ही प्रवृत्ति आजकालची नाहीं; फार पुरातन आहे. हिच्या मुळाशी अज्ञान, दुराग्रह किंवा मत्सर असतो. या विकारांचें पटल दूर करण्याचे सामर्थ्य कालामध्ये आहे. अशा दृष्टीने पाहिले असतां आधुनिक मराठी कवितेची खरी योग्यता कालान्तरानेंच निर्णीत होणार यांत संशय नाहीं. आतां प्रस्तुत पुस्तकाच्या स्वरूपासंबंधाने दोन शब्द लिहितों. यांत एकंदर अठरा कवींची लहान मोठी ११५ काव्यें आली आहेत. कवीमध्ये दोन खिया, एक लहान विद्यार्थी व इतर प्रौढ गृहस्थ आहेत. कवींपैकी चिपळूणकर, केशवसुत व घांटे हे गत असून बाकीचे सर्व विद्यमान आहेत. कवि काल- क्रमानें घेतले आहेत. एका कवीचे उतारे संपले ह्मणजे दुसरा, त्याचे झाले लणजे तिसरा अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक कवीच्या नांवाखाली त्याचा जन्मसन व तो गत असल्यास मृत्युसनही देऊन त्याच्या खाली त्याने केले- ल्या काव्यांची यादी दिली आहे. उता-यांतील आशय, अवश्यक वाटला तेथें, उतान्याच्या आरंभी दिला आहे. टीपा कवींच्या आहेत. पुस्तकांतील काव्यें बहुतेक वृत्तात्मक असून काही पदरूप आहेत. संस्कृत वृत्तें बहुश्रुत वाचकांच्या बहुतेक परिचयाची असल्यामुळे त्यांची नांवें दिली नाहीत. एकादें दुसरें अपरिचित वृत्त आले ते मात्र दिले आहे. संरकत्व वृत्तात्मक पद्यावर फक्त 'श्लोक,' किंवा 'गीति' असल्यास 'गीति' असे लिहिले आहे. प्राकृत वृत्तांची दिंडी, साकी अशी नांवें दिली आहेत. पदांवर बहुतेक ठिकाणी प्रसिद्ध चाली दिल्या आहेत. उतारे घेतांना विषय, विचार, भाषा