पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ तेव्हां कोणतेही काव्य घ्या; चमत्कृति त्याचें बीज आहे. जेथें कांही चमत्कार नाहीं, सौंदर्य नाही किंवा रंजनाचें साहित्य नाहीं तेथें मात्र काव्यशब्दाची व्याप्ति नाहीं. काव्याचा प्रधान हेतु रंजन आहे. तदनुषङ्गानें कवि बोध करितो व सृष्टीतील अनेक रहस्यें व तत्त्वें प्रकाशित करितो. यावरून काव्य ही वस्तु उच्च प्रतीची करमणूक असून मानवजातीची उपकर्त्री आहे हे उघड आहे. अशा प्रकारच्या वस्तूचें योग्य प्रकारे संरक्षण करणें हें समाजाचें एक पवित्र कर्तव्य आहे. ऐतिहासिक दृष्टीनेंही काव्यसंग्रहाचे काम महत्त्वाचे आहे. कवीच्या कृतींत पुष्कळ वेळां देशकालपरिस्थितीचें प्रतिबिंब पडलेले असतें. पेशवाई- च्या अखेरपर्यंत झालेल्या मराठी कवींना आपण जुने मराठी कवि सम- जतों. त्यांपैकी मुक्तेश्वर, रामदास, तुकाराम, निरंजनमाधव इत्यादिकांच्या काव्यांत मधून मधून त्या त्या कालच्या धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या भावना उमटल्या आहेत. इतिहासकाराला त्यां- पासून बरीच मदत होण्यासारखी आहे. जुन्या मराठी कवींच्या कृतींचे आजपर्यंत अनेक संग्रह झाले आणि अद्यापिही कांहीं चालू आहेत ही गोष्ट वरील दृष्टीने फार प्रशंसनीय आहे. इंग्रजी राज्याबरोबर नवीन मराठी कवितेचा उदय झाला. राजक्रांती- बरोबर भाषा, विचार, व्यवहार इत्यादिकांचीही क्रान्ति होत असते. तशा प्रकारचें स्थित्यन्तर आपण सध्यां अनुभवीत आहों. या संक्रमण- स्थितीचें प्रतिबिंब अर्वाचीन मराठी काव्यांत विविध रूपांनी पडलेले आहे. 'काव्यरत्नावली, ' मासिकमनोरंजन, ' 'विविधज्ञानविस्तार, ' इत्यादि मा- सिक पुस्तकांचे अंक चाळून पाहिले असतां या विधानाची यथार्थता प्रत्ययाला आल्यावांचून रहात नाही. पुढील इतिहासकाराला या वाङ्मयाची चांगली मदत होण्यासारखी आहे. याकरितां त्याची परंपरा कायम ठेवून तें चिरस्थायि करणें अवश्यक आहे. असले वाङ्मय ग्रंथरूपानें प्रकाशित करून त्याचा प्रसार करणे हाच तें चिरस्थायि करण्याचा राजमार्ग आहे. याप्रमाणें उच्चप्रतीचें करमणुकीचें साधन व ऐतिहासिक उपयुक्त वाङ्मय अशा दोन दृष्टींनी काव्याचे महत्त्व आहे; आणि ह्मणूनच त्याचा [1]