पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व वृत्त यांच्या वैचित्र्याकडे लक्ष पोंचविले आहे. शिवाय ग्रंथाचें बाह्यांग चांगलें करण्याविषयीं यत्न केला आहे. तथापि यांत न्यूनाधिक राहिलें नाहीं असें ह्मणवत नाही. त्याबद्दल सहृदय वाचक क्षमा करि तील अशी आशा आहे. अभिनवकाव्यमालेच्या दुसऱ्या भागाचे संपादकत्व शारदाप्रसादनमंडलानें सुप्रसिद्ध महाराष्ट्रकवि रा० नारायण वामन टिळक यांजकडे सोंपविले आहे. आधुनिक कविमंडळ त्यांच्या विनंतीस मान देऊन त्यांस योग्य ती मदत करील असा भरंवसा आहे. सदाशिव पेठ, पुणे. डिसेंबर, इ. स. १९०९. लक्ष्मण गणेशशास्त्री लेले. सूचना. १. ' मुताविरह ' या नांवाच्या काव्याला या पुस्तकाच्या ६३ व्यापा- नावर आरंभ झाला आहे. या काव्याला विषयीभूत झालेली कन्या श्रीमंत पंतसचिव यांचे प्रस्तुतचे कारभारी रा० ब० श्रीधर आबाजी सातभाई यांची नात असून रा० रा० विष्णु बाळकृष्ण चंद्रचूड, एम्. ए., यांची गत- पत्नी होय. हिचें माहेरचें नांव 'कमला' व सासरचें 'सौ० रमाबाई' असें होतें. वरील काव्य छापून तयार झाल्यावर ही माहिती मिळाली. ती जिज्ञासु वाचकांकरितां येथें दिली आहे. २. ८६ व्या पानावर कृष्णाजी केशव दामले यांचा जन्मसन १८६५ असा दिला आहे तो १८६६ असा समजावा. 3. याशिवाय दुसरे कांहीं मुद्रणदोष राहिले आहेत त्यांबद्दल सहृदय याचक क्षमा करितील अशी आशा आहे. संपादक.