पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. गेल्या वसंतामध्यें पुणे येथें कांहीं मराठी कवि जमले होते. त्यांनी 'शारदाप्रसादनमंडल' या नांवाची एक संस्था स्थापन केली. लहान लहान पुस्तकांच्या रूपानें आधुनिक मराठी पद्यात्मक वाङ्मय प्रसिद्ध करावें असा या मंडलाचा हेतु आहे. हे पुस्तक त्या हेतूचें पहिलें दृश्य फल आहे. 4 उद्दिष्ट पुस्तकमालेला मंडलानें 'अभिनवकाव्यमाला' असें नांव दिलें आहे. या मालेचा हा पहिला भाग आहे. मंडळाच्या वतीने आह्मी हा भाग सर्व महाराष्ट्रवाचकांस प्रेमपूर्वक अर्पण करितों. अभिनवकाव्यमालेचा हा खंड सरस आहे की नीरस आहे, गंधवान् आहे किंवा गंधहीन आहे, सुदर्शन आहे अथवा दुर्दर्शन आहे याविषयी आह्मी लिहिणें प्रशस्त नव्हे. तें काम अर्थात् काव्यरसज्ञांचें आहे. सुसंस्कृत मनुष्याच्या मनोवृत्ति उत्तेजित करून त्या उद्दाम करून सोड- णारी जी वाणी तिला काव्य अशी संज्ञा आहे. असें काव्य प्रसवणारी जी दिव्य शक्ति तिला प्रतिभा ह्मणतात. अशा प्रतिभेनें संपन्न जो पुरुष त्याला कवि ही पदवी आहे. परमेश्वराचा कृपाकटाक्ष ज्यावर पडतो तो प्राणी मूळचा कितीही हीन असला तरी तत्काल महाभाग्यशाली चनतो. तद्वत् कवीची प्रतिभा ज्या वस्तूवर पडते, ती वस्तु कितीही क्षुद्र असली तरी दिव्य दिसूं लागते! असा त्या प्रतिभेचा विलक्षण प्रभाव आहे. वर सांगितलें हैं सऱ्या काव्याचे लक्षण आहे आणि तें अनेक प्रसिद्ध व रसिक पंडितांना मान्य आहे. जगद्वन्य महाकवींच्या लोकोत्तर कृतींत अशा काव्याचे नमुने दृष्टीस पडतात. असे कवि व अशी काव्य फार विरळ असतात. तथापि 'कवि' आणि 'काव्य' यांच्या लक्षणांची व्याप्ति आपण पुष्क- ळंवेळां अधिक मानितों. णजे पूर्वोक्त काव्याच्या कसोटीला सर्वथा उतर- णारी कविता नसली तरी देखील आपण तिला 'काव्य' समजतों व तिच्या प्रणेल्याला 'कवि' ह्मणतों. याचें कारण असें आहे की, त्याच्या कवितेत कांही तरी चमत्कारावह सौन्दर्यसामग्री सिद्ध असते व तिच्या योगानें आ पलें मन प्रसन्न होतें.