पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० अभिनवकाव्यमाला - भाग पहिला. निघतां तो सुज्ञ होतें कौतुक तें गोडवें, नाहीं तो भोग तीचा अपुलाही ओढवे ! ४. उपवर कन्या. श्लोक. १ लग्नाला जी जाहली योग्य तीचे, होती जे जे सोहळे की सुखाचे, ते वानावे हीच इच्छा धरून, हाती येतें लेखणी मी जपून. माझ्यासाठी सुस्थळा शोधण्यातें, बाबा गेले जेधवां गे पुण्यातें, नेले मातें सेधवां दाखवाया, केला वाटे शीण तो व्यर्थ वायां. कोठें मेली पत्रिका ती पटेना, कोठें माझें रूप हैं आवडेना, कोणी मोठी, सान कोणी गणीती, होते बाई काय सांगूं फजीती ! ३ कोणी बोले नाक हैं नीट नाहीं, डोळ्यांमाजी तो दुजा व्यंग पाही, कोणी कांही खोड काढी नवीन, स्त्री जातीची ही स्थिती हीन दीन! ४ कोणी कोणी पुस्तकें वाचवीती, कोणी बोले ही नवी चालरीती, कोणी प्रश्ना घालुनी बोलवीती, कोणी उंची मोजुनी माप घेती ! ५ कोणी सांगे छानसें गीत गाया, कोणी हाती सूय देती शिवाया ! ज्याची त्याची वेगळाली परीक्षा, देती वादे काय ही घोर शिक्षा ! ६ गे बाजारों गाय घोडे विकाया, येतां जैसे लोक येती पहाया; ह्या की बाला आणियेल्या विकाया, नोहे कां ही श्रेष्ठ गे मर्त्यकाया ? जीचे पोटीं भास्कराचार्य यावे, ज्यांनी ज्योतिर्मण्डला आक्रमावें, जी की वीरां पंडितां जन्म देते, ती स्त्री येथें विक्रया काय येते ! ८ शीला किंवा लौकिका नेणताती, द्रव्या किंवा सुस्वरूपा पहाती; ' ही कोणाची?' हैं पुसे कोण बाई ' 'हुंडा देती काय ?' हा प्रश्न येई. ९ कोणी लक्ष्मीपुत्र कोणी भिकारी, दोघे हुंडा मागती दुर्विचारी, कोडे पैसा जोडिला पूर्वजांनी, कोटे नाही अर्थ कांहीं ह्मणोनी ! १० झाला पैसा खाउनी एक थोर, कोणी देवी दाबुनी थंडगार; कोणाची गे वोखटी चालरीती, वाटे त्यांची भेट घ्यायास खंती. २२ नाहीं ज्याच्या मान कांही कुलाला, तोही पावे पुत्रयोगें पदाला ! विद्येचा गे गंध सातां पिढ्यांत, नाहीं तोही पुत्रयोगें कृतार्थ ! आचारी वा पाणक्या कां असेना, तोही पुत्र पावतो थोर माना ! जो जन्माचा राहियेला करंटा, मानापाना घालितो तोहि तंटा ! १३ जो तो पाहे नोवरी तुस्वरूप, कोणी पाहे नोवऱ्याचें न रूप ! १२ २