पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ गणेश जनार्दन आगाशे. राहो मोठा खेचडा लेंबडा वा, तो पोरींना सर्वथा आवडावा ! १४ ऐशा सांगू काय बाई ! अपेष्टा, स्त्रीजातीच्या जाणतो कोण कष्टा ? हा लग्नाचा लागतां पाधीशा, पोरींना हा जीव होतो नकोसा ! १५ ५. कवि आणि काव्य. कविताशक्ति ही ईश्वराची देणगी आहे. ती श्रमानें प्राप्त होणारी गोष्ट नव्हे. काव्याचें बहिरंग म्हणजे अनुप्रास, यमक इत्यादिकांचा थाटमाट, मंजुल वृत्तांची निर्दोष रचना इत्यादि ठाकठिकीच्या गोष्टी, श्रमसाध्य आहेत. परंतु रस हा कवितेचा आत्मा आहे, ह्मणून रसयुक्त जें काव्य तें खरें काव्य व असें काव्य करणारा तो खरा कवि होय. हैं तत्व या उता- न्यांत कवीनें प्रतिपादिले आहे. श्लोक. २ प्रतिभा स्फुरते न अंतरंगी, नच बुद्धी अपरोक्षमार्ग लंबी, नचि निर्मि नवीन रम्य सृष्टी, दिधली ती विधि न दिव्य दृष्टी. न फुढे हृदयीं कधीं उमाळा, बवतां दुष्कृति जीव हो न गोळा, फुटती न अपाप शब्द वाचे, बघतां कौतुक भूतली अजाचें. पडतें श्रवणीं न मंजु गीत, भरुनी जें उरलें असे क्षितीत; मन आत्मिक सौख्य तें न चाखी, जाग आनंदघना न जे विलोकी. ३ 'टसि मी जुळितों कसा तरी 'ट,' कवि तो मानिति रामदास 'धीट'. यमक्या गणिलेंहि वामनाला, कवि व्हाया मज हाव ती कशाला ? ४ भवभूति कवी नगापगांतें, रडवी, बोलावे दंडकावनातें; ६ अनुभाव तदीय व्यासि दावा मजला तो उपलब्ध केविं व्हावा ? ५ कवि तो सुकृती मनासि वेधी, मनुजाभ्यन्तरवृत्त जो निवेदी, ह्मणुनी कविमंडलावतंसा, भजती शेक्रूस्पियरास कालिदासा. तमसा, सरला, प्रियवंदा, अनसूया कवणासि वा कदा हरिती न ? निसर्गसत्यता हृदया आकाळ हीच धन्यता. न जपें, न तपें, न वा श्रमानें, मिळते अध्ययनें न वा धनानें; हरिचाचि खरा महाप्रसाद, कविताशक्ति गर्ने निसर्गसिद्ध. दिधली कविशक्ति ही जयाला, हरिनें तो न गणी परिस्थितीला, सहज प्रकृतीच गोड गावें, इहलोकी जंव त्या जर्ने जगावें. कविमानस मारितें भरारी, क्षणमात्रीं त्रिदिवांत गूढचारी; १ ७ ९