पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विष्णु मोरेश्वर महाजनि. रसालतरुची जेथें निविडा छाया पसरे दूर, अथवा जेथें वितान करि तो वटशाखा विस्तार, अथवा निर्झरतीरी जेथें वेतस वाढे मृदुल, हरितशाली ध्यान कराव पसाने आंगें शिथिल, कवीस येथें कळोने येतें जीवदशेचें सार, लोनें भ्रमती जन ते कैसे, करिती श्रम अनिवार, कुलधनविद्याग फुगले लघु ते कैसे दिसती, आख्या ज्यांची गुणिजन ऐशी, तेथे गुण ते नसती. पहा ! रवीचा प्रभाव ! विरमे शांत कृबविल आतां, सेदुनि छाया पशुही करिती रोमंथा अभ्यस्ता. गुंजारव षट्पदगण करितो, भरवी सर्व दिशांतें, मधुरस चाखायातें उत्सुक सेवी तो सुमनातें. अर्धपीत तें सुम टाकुनियां दुसरें सेवी हर्षे, परि चंचलमति होती कैसा स्थिरतर सुगुणोत्कर्षे ! पतंग गर्ने दावी शोभा पक्षगता रंगाची, नरही खुलतो भूषणवसनीं काय कथा इतरांची ! पतंगजीवितसम नरजीवित वाटे तत्त्वज्ञाला, सान थोरही धूळिस मिळती, जेथुनि उद्भव झाला ! उद्योगीं रत राही जन कीं. विषयासक्त असो की, जीवितदिनभरि करितो लीला दैवाधीन विलोकी ! येतां संकट, वयें वांकडीं होतां अंगें सारी, लीला सरती, गमजा तुरती, सन्मय नर अवधारीं । भ्रमर न गुंजारव करिती है, करिती मदुपालंभा, ह्मणती वाटे 'भल्या शाहण्या, व्यर्थचि करिशी दंमा ! ' क्रीडा करण्या नाहीं तुजसी रमणी सुखैकधामा, सुखमधुनें तुज भरलें गृहसुम न मिळे उपरतकामा ! 'उंची वसनें नसती तुजला भूषविण्या देहाला ! ' घालविलें अविचारें यौवन, काल न येई गेला! ‘आयुष्याचा वसंत गेला तदुपरि चारी ऋतुही, 'शिशिर पातला, शीर्गपर्ग हा झाला वद्रुम पाहीं 'अमुचा आहे वसंत अञ्जुनी, क्रीडा कां न करावी ? ' तत्त्व सांगतों, कविजनचित्तं मत्सरिता न वरावी. ' १७ ७ ८ ९ २० ११ १२ १४ २५ १९