पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ अभिनवकाव्यमाला-भाग पहिला. २. सुशील भार्या . दिंडया. २ दृष्टिविषया जेधवां प्रथम आली, मार्ते मोदाची गमे मला आली, नयनसुख की देण्यास पाठविली, देवकुमरी, पाहोनि दृष्टि धाली. १ नेत्रकांती ती तारकासमान, कृष्ण कुंतल ते कृष्णरात्रि मान; परी जाणें तीं इतर सर्व अंगें, साच मधुनें निर्मिली की अनंगे ! रूप अनुपम, लावण्य तयीं नाचे, मोह घाली ते भ्रमवि चित्त साचें; जाय तेव्हां हरुनहि हृदय नेते, कशी स्त्रीची मोहनी कळों येते ? ३ रूप जैसे मन दिव्य दिसे तैसें, कसा प्रणये वदनेन्दु तो विकासे, सत्त्वशीला गति, धर्मपरा बुद्धि, मानसाचीही लाभलीच सिद्धि सत्य भाषण, आचरण सत्य तीचें, मुखीं झळके प्रेमही मानसाचें; मला वाटे भवसागरा तराया, दिली देवें की हीच तरी जाया. क्षणिक दुःखें ती बोध करुनि वारी, प्रणयकलहीं आणि ते नयाने वारी, नर्म वचनें, स्मित मंद, मधुर वाणी, असे सर्वांची अहा प्रिया खाणी ! पूर्ण अवगत हो तिचें हृदय आतां, नसे अवतरली साच अशी कांता ६ अतुलधैर्या ती शांत सहनशीला, हो न कष्टी भोगितां दुःखमाला. (19 दूरदृष्टी औदार्य विनय अंग! काय चातुर्ये शोभते कृशांगी ! निर्मिली ही संपूर्णगुणनिधान, बोधवचनें करण्यास समाधान ! जरी विसरे पति आपुला पुमर्थ, तरी आकळण्या त्यासही समर्थ, देवकन्या जरि साच भासताहे, स्वस्थचित्तं ती तरी दुःख साहे. ५ ८ ३. वसंतसमय. साक्या. पाही ! आला मन्मथसख हा वसंत, सुमनें फुललीं ! वनराजी ही शांता आतां अलिगीतें गजबजली ! आश्री कोकिलरव तो परिसुनि हुंकृति देती रावे, गायन शिकवी कोण तयांना जेणें कर्ण भरावे ! कुसुमापासुनि सुगंध हरुनी झाले जड जे फार सुखकर शीतल मंद अनिल ते करिति नभीं संचार. ४ ९ १ २ ३ १ ‘ She was a phantom of delight' या वर्डस्वर्थ कवीच्या काव्याचें हे रूपांतर आहे, २ ‘Ode on the spring' या टॉमस मेच्या कवितेवरून.