पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विष्णु मोरेश्वर महाजनि. जन्म इ. स. १८५१. रा. ब. विष्णु मोरेश्वर महाजनि, एम. ए., यांचा कुसुमांजलि या नांवाचा एक काव्यग्रंथ आहे. त्यांत एकेचाळीस लहान लहान स्फुट प्रकरणें आहेत. तीं सर्व अनेक प्रसिद्ध इग्लिश कवींच्या काव्यांच्या आधारानें रचिलीं आहेत. याशिवाय रावबहादुरांची थोडी स्फुट कविताही आहे असे समजतें. १. तरुण जनांच्या इच्छा. लावणी-साधी चाल. इह लोकींचें जन्म फुकाचें मनांत ऐसें आणु नये, आपआपले कर्म कराया स्रजिलीं ईशें तनु सदयें ॥ ध्रु० ॥ वरतें वरतें लोकर जाऊं, जाऊं वैभव शिखराला, मागें ठेवूं कीर्ति आपुली, देवूं कविला गायाला, देशाचें हित करण्यासाठी अर्पू विशंक जीवाला, यश द्यायाला अनन्यभावें प्रायूँ त्या जगदीशाला. खोल खोल हो जाऊं, सेवूं रत्नाकर तो ज्ञानाचा, सृष्टीचे ते धर्म आकळूं, रस चाखूं या विद्येचा, विद्यापीठी अर्थ मिळे जो, आहे तो बहु मोलाचा, येर अर्थ तो अनर्थ झाला, नाहीं कवण्या कामाचा. पुढे पुढें हो चला गड्यांनो, पंथ न सोडूं धर्माचा, नीतीडनि तें अन्य नसे सुख, पाया त्या सत्कर्माचा, अपुला आत्मा दिव्य असे हा, उतरुनि आला स्वर्गीचा, इहलोकींही दिव्य सुखाचा अनुभव घेऊं या सांचा. जवळि जवळि या प्रेमबंधनें दृढतर सारी होऊं द्या, घरचें सूख जरि आहे तरि मग किती विपत्ती येऊं द्या, कशास भीतां ? वारुन टाकूं, धैर्य निरंतर राहू द्या, घरचें सोडुनि अन्यसुखातें शोधिति त्यांना जाऊं द्या. १ ही कविता जेम्स माँटगॉमेरीनामक कवीच्या ' Aspirations of youth या चुटक्याचें भाषांतर आहे. ३ ४