१४ अभिनवकाव्यमाला - भाग पहिला. काळ गणीना रंक किं राजे ! दुःख दावितो वदवेना जें; हृदय माझ्या काडर माजे ! दुःसह गे भार्ये ! काय प्रभूला पडली वाण ? नेलि सुखाची माझी खाण ! हृदय विधिती वियोगबाण, रात्रंदिन भायें ! ९ १० ५. धैर्य व तलवार यांची गाळण ! कृष्णाकुमारीच्या बापानें जोवनसिंग नामक तिचा वध करण्याकरितां पाठविलें होतें. तो सेवक कुमारीवर चालवूं लागला, तेव्हां कृष्णाकुमारीची धीरोदात्त मूर्ति व प्रकृति पाहून त्याचें धैर्य व तलवार ही एकदम गलित झालीं ! तो हा प्रसंग आहे. आपल्या एका सेवकाला आपली तलवार कृष्णा- श्लोक. देवा भाग पडेल शासन मला योजावया नूतन ! हैं होवो कधिं मृत्यु नेइल तथीं ! आधीच ह्या यातना भोगाया नच सिद्ध मी ! प्रलय हा वाटे गिळी मन्मना ! वाटो योग्य मला अयोग्य अथवा; दुष्कर्म हैं तो खरें ! मारावें असती अरक्षित तयां हैं कोण बोले बरें ? जे होती रणशूर वीर समरी, हिंसा तयांतें अशी दात्री जांचाणेची ! अनंतपरिंनी चित्ता न जाळी कशी ? चित्ताला जळणूक मी अशि कशी लावून घेऊं सदा ? माझें पाप मदर्थ हैं उपजवी कैसें न हो आपदा ? कन्येच्याहि जिवावरी जनक तो झाला उदार स्वयें ! पाणी सोडुन मींहि शांतिवर कां व्हावें तसे निर्दयें ? जी तर्वार रणांगणांत समरीं वीरापुढें गाजुनी, योद्धयांतें करवी सचैल रुधिरस्नाना शिरें छेदुनी, छेदाया अबले अरक्षित अशा व्हावें पुढें कां तिणें ! मी हाती तिजला धरून निरवीं! विग्धिग् ! जळो हैं जिणें ! १ आहे अंकुश कां गजा त्यजुनियां मुंगीस हाणावया ? व्याघ्रा सोडुन पारधी टपत कां शेळीस छेदावया ? कौमार्यै सजली गुणी मधु कळी ही शुद्ध हो सर्वथा ! मारोनी हिजला कुठें किति सहूँ मी पातकाच्या व्यथा ! हिंसेला असल्या अगा नरकही साजे न तो शासन; २ ४ ५
पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२३
Appearance