पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डॉ० कीर्तिकर. तुझ्या संगें आयें सकलकुलशोभा हरपली ! रडोनी स्फुंदोनी नयन सुजती, अश्रु गळती, निशीं निद्रा नाहीं, तनु विरहवह्नींत जळती, ह्मणावें गेलीस त्यजुनि मशि दावा धरुनियां, कसें तैसे होई तुजसम न शान्ता भुवनं या. सदा जी चित्ता दे सुख मधुर वाणी बदुनियां, महा माया लावी सतत सकलां दावुनि दया; बहु ज्ञाती स्त्री ती परि तिज नसे गर्व तिळही, गुणां गाई तीच्या सकल बहु संतोषित मही. महा मिथ्या माया, सकळ जग सांचें मृगजळ, उलाढाली होती विविध, परि त्या सर्व विफळ, प्रभा जीची पूर्णा शशिसम पडे नित्य सुखदा तिथें आतां झालें तिमिरमय, मी भोग विपा. ४. पत्नीव्रताचे अश्रु. अंजनीगीत. गेलिस मजवर रुसूनियां कां ? कोठवरी मी मारूं हांका ! कंड शोषला ! असह्य शोका, बळि पडलों भायें ! तळमळ ! तळमळ ! तळमळ सारी ! फिरलों जारे मी दारोदारीं, भिक्षा ऋणुनी तुजला पदरी, टाकिल कां कोणी ? झाली पुरती तनुची होळी ! तुजसाठी मी घेतों झोळी, मिळवाया तुज आळोआळीं, फिरतों गे भायै ! त्या मातेला पडला घोर, भावंडांना दुःखहि थोर, मम नगनां ये अश्रूपूर, जातां तूं भायै ! तूं स्वर्गीची सुधाच गोड ! नित्य नवें पुरवावें कोड, झाला ऐन उमेदित मोड, माझा गे भार्ये ! शब्द कठिण मम तोंडावाटे, निघतां, उघडुनि स्वर्गकपाटें, अक्षय सौख्याचें त्वां सादें, केलें कां भायें ! कां न राहिलिस थोडे दिवस ! संसाराची पुरविलि हौस ? झाला प्रीतीरसविध्वंस, कैसा हा भायें ? कां न ठेविलें एकहि बालक, प्रेमजनित तें प्रेमस्मारक ! जाणे स्वकला तो जगचालक, एकचि गे भार्ये : १३ १२ १३ १४ १ २ ३ ४ 19 6