पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ अभिनवकाव्यमाला-भाग पहिला. नाहीं मोल असेंचि दुर्मिळ महा चोरोनि नेलें धन, शोभा मंदिरिंची हरोनि करिशी ओसाड त्याचें वन ! अंतर्याम न भिन्न तें; जरि दिसों देहें निराळें जना, केलें नाहीं कधीहि जें न रुचलें दोघांचिया गे मना; आतां यापरि एकलाचि जरि मी राहें तुझ्या मागुनी नाहीं मी करणार अप्रिय तुझें चित्तेंहि गे मानिनि ! गेलीस त्यजुनी सुखास सहसा ! चित्तीं असें की अढी ? जातां त्वां आपुल्यासवें ह्मणुनि की नेलासि ना सौंगडी ? कंडू काळ कसा सखे ! तुजविणें या मंदिरीं राजसे ! येथें शून्य तसें उदास सगळे आतां मला गे दिसे. सौभाग्या तव रक्षिलें प्रभुवरें हा लाभ झाला भला, सोसावें सखि दुःख मींच; न तुवां; हे योग्य वाटे मला; मी आहें रणशूर; शांत अबला तूं भीरु गे कोमला ! हा चिंताज्वर शोकजन्य सखये गे सह्य आहे मला. संग्रामांगणि या जना प्रभुवरें संरक्षिलें सुंदरी ! होता सन्निध काळ फार कपटालागीं परी नाचरी ! पाठी रक्षक सत्कृपाकवच तें घालोनि राहे उभा, टाळीले अशुभा, तुझ्या पदारं गे बांधोनि दिव्या शुभा. भ्यालों नाहि रणीं, पराङ्मुख कदा झालों न मी संगरी, धिक्कारोनि तुला, न भीति धरिली मृत्यो ! तुझी अंतरी; होतों मानित युद्धिं धैर्य धराने त्रैलोक्य म्यां जिंकिलें; हा हा ! शेवटिं तूंचि जिंकुनि मला दुःखार्णवीं लोटिलें ! घरा यावें तेव्हां मज दिसतसे चंद्रवदना, अतां कोठें गेली ? कुणि लपविली कुंदरदना, पहावें धुंडोनी सकल गृह खाली वर तरी दिसेना ती कोठें ! अनिश उठती दुःखलहरी ! कुठें पाहूं आतां सुमुखि, तुझिया हास्यवदना ? प्रिये ! सांगे कोठें मधुर तब ऐकेन वचना ? तुझ्या येती कांते प्रणयरसगोष्टी मम मनीं, विझाली ती ज्योती अहह ! सहसा वात सुटुनी ! अहोरात्री जीवा तळमळ, न कांहींच करने, न कोठेंही कांते स्वमन लवही है उपर मे; अकालीं जायाची तुज सखि कशी गोष्ट रुचली ? ६ ९ १०