पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डॉ० कीर्तिकर. तुजसि शरण आलों सर्वभावें दयाळा, अशरण तव कंडी अर्पितों प्रेममाळा; पदरिं मजसि घे हैं मागणें तूजपाशीं, तुजसम न दुजा या लोकिं कारुण्यराशी. दृढतर मन लागो पार्थि तूझ्या उदारा, घडिभरि विसरी हैं सर्व संसारभारा, क्षणभरि तरि होवो मंगला ! भेट तुझी, हृदयें तुज धरावें आवडी हेचि माझी. तव शुचि यश गातां चित्त संतोष पावे, प्रियतम गमशी तूं नाम जेव्हां जपावें; सतत मजसि लाधो बा तुझी पादसेवा, तव पदरजिं मोठें मानें मी सौख्य देवा ! नामाचा जयघोष होवु, सदया देवा, तुझ्या सर्वदा, वत्सांच्या हृदयीं सदैव रमतूं, हे वत्सला, शर्मदा ! कोठें ठाव मिळो न एक पळही दुर्वासनेला कदा, बंधुप्रेम महीवरी जनमनी वाढो, टळो आपदा. ३. गृहिणीविरह. श्लोक. इंद्राचें धनु दिव्य शोभत असे आकाशपंथावरी, सौंदर्यै भरल्या दिशा, विलसती तें रंग नानापरी, झाली शीतल मेघवृष्टि, फुलल्या गंधी फुलांच्या कळ्या, होतां तुष्ट धरा वनीं विकसल्या रम्या लता कोवळ्या. वारा वाडाने मंद मंद खुलते ही सर्व देखा रसा, तेणें शांति चहूंकडे पसरुनी आनंदवी मानसा, ऐसा रंग जिथें तिथें विसलतो. मी मात्र शोकानलें जाई होरपळोनि हाय सदनी ! हें काय हो जाहलें ! अंगाची बहु काहली, मनहि हैं आंतोनि पेटे अहा ! केली बास्तव की तये निशिं, विभो ! पर्जन्यवृष्टी महा ? ते सारेहि पयोनिधी तनुवरी या ओतियेले जरी होई दाह न शांत ती परतुनी आल्याविना सुंदरी ! हे मृत्यो ! तुज वाण काय पडली ? घाला इथें घातला ! प्रेमोत्कर्ष, तुझ्या मनास, अमुचा कां अंतका जाचला ? ११ २ ३ २ ३