पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिनवकाव्यमाला - भाग पहिला. न कां आजी देशी प्रतिवचनही एक मजला ? असा कां माझ्याशी अवचित अबोला धरियला ? स्वरूप काव्याच्या अजवार सखे, जे प्रकटले, विलास प्रीतीचे सरस अमृतातुल्य घडले, तयांचा दुर्दैवें अवचित असा नाश घडतां, पुढें आतां कैशी मधुर मम होईल कविता ! १७ तीं भाषणें मधुर जी अमृतासमान, लावण्य तें रतिहि देत जयास मान, तें शील ज्यास तुलना न मिळेचि कोर्डे, कोणास हर्ष गुण हे स्तवितां न वाटे ! १८ १० कान्होबा रणछोडदास कीर्तिकर. जन्म-इ. स. १८४९. लेफ्टनंट कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, आय. एम्. एस्., ह्यांची भक्तिसुधा, विलापलहरी आणि इंदिरा अशीं तीन काव्यें प्रसिद्ध आहेत. ह्यांची इतर स्फुट कविताही थोडीशी आहे. १. भक्ताचा टाहो. पद. चाल - धांव विभो करुणाकर माधव-- येइ प्रभो ! सुखकारक तारक, नतजनपालक अखिलदुरितहर ! ध्रु० निर्वाणींचा प्राणसखा तूं, ह्मणुनि शरण तुज हा तव किंकर. ध्यान भजन है जीवन ज्याचें, इतर सकलही भासे नश्वर. पडतां मजवरि संकट कांहीं, धांव लवकरी त्यांतुनि उद्धर. धरुनी हृदयीं तव पदकमलां, प्रेमें गुण मी गाई निरंतर. देउनि मजला ठाव तव पदीं, मोक्षपदा ने हे करुणाकर ! २. करुणापंचक. श्लोक. अनुदिन तुज देवा शुद्धभावें नमावें, तव विमल गुणांच्या गायनीं म्यां रमावें, न कधिं विषयसौख्या सेवुनी गुंग व्हावें, परि चिरसुखशांती मेळवाया झटावें.