पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णशास्त्री चिपळूणकर. नसे थारा त्यांतें, मजहि दुसरा, ज्ञात तुजला. प्रभापावित्र्यांहीं स्वसम तुज पाहून, दहना अला वाटे हेवा मानें बहुत त्या कृष्णवदना, तयानें त्या रोषें, मज गमतसे जाळिलि तुला; दया त्या कैची ! जो स्वजननिहि खाऊं न चुकला ! १० सुधास्प जेवीं निवाते नयनें जीस बघुनी, जिचा कंडी वाटे कर कमलहारापरि मनीं, करी जी उल्हासा अतुल, कविता सुंदर जशी, तुला नाहीं कोठें मनुजभुवनीं योग्य तिजशी. न पाही स्वमींही पतिविण कधीं जी नर दुजा, स्पृहायुक्तं चित्तें, जितकर्मलनालोत्तमभुजा, सुशीला तूं ऐशी, परपुरुषं जो निर्गुण, तया कशी पाहूं जाशी, हरिणनयने, सत्वर तथा ? गुणांनी जी पर्णा, असम नसे दोषहि जिला, अलंकारी साजे, रस वसतसे जीत पहिला, मृदू जींचे वर्ण श्रवणसुख देती परिसतां, वसे ती पद्माक्षी जशि हृदयि माझी सुक्रविता. न जाणों दुर्दैवें अगळिक असे काय घडली, जिच्या योगें ऐशी तव मानें अढी थोर पडली, ह्मणोनी सोडोनी मज, रुसुन गेलीस सदनीं सखीमुक्तीच्या तूं असुनि विमला कीर्तिहि जनीं. सुधातुल्यें हास्यें करुाने अभिषेकास मजला, कटाक्षांनी वर्षे जणुं मजवरी नीलकमलां. मृगाक्षी, मांगल्य प्रविधिविधात्री, सुवदना, न सोडी चित्तातें क्षणभरिहि ती कुंदरदना. बसोनी पर्यकी दयितगुण गातां निजमुखें दिनें नाहीं झालीं बहु निरखुनीयां तुज सखे ! .१२ १ अनि आपली आई अरणी हिला जाळतो या गोष्टीकडे येथें लक्ष आहे. २ कमलाच्या देंटास जिंकणारे उत्तम भुज आहेत जिचे. ३ पतीहून अन्य, पक्ष ईश्वर. ४ मूर्ख, ईश्वरपक्षीं सत्त्व, गुण व तम यांहीं रहित. ५ या पद्यांत गुण, दोष, अलंकार, रस आणि वर्ण हे शब्द श्लिष्ट असून ते पद्माक्षी आणि सुकविता यांजकडे सारखेच लागू पडतात हें बहुश्रुत रसिकांच्या सहज लक्ष्यांत येईल. ६ मंगल कृत्य करणारी. वरील दोन चरणांतील अभिषेक व कमलवृष्टि हीं मंगलकृत्यें समजावीं.