पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिनवकाव्यमाला-भाग पहिला. असे झाली माझ्या अगळिक करें कोणति अशी ? बुजालें दुःखानें स्मरण विषयांचें अवघिया, अनभ्यास गेली मज सकळ विद्या त्यजुनियां. जिचे डोळे काळे बघुनि मृगबाळेहि झुरती, वसे चित्तीं देवीपरि सतत ती मात्र सुदती. निघोनीयां जातां अवचित सखी मुक्तिसदना, दयाशीला, वाटे, विसरलि दयाही सुवदना ! कटाक्षांहीं नीलांबुजमदहरांहीं मजवरी, कृपालेशातेंही प्रकट ह्मणुनी आज न करी ! पडायाच्या भीतीस्तव मम कराते धरुनियां विवाहीं पाषाणीं चढलिस, सखे, तूं जपुनियां, कशी ती तूं आजी चढाशे मज सोडोनि, गगनीं, करी ऐशी शंका हृदय शतधा, येउनि मनीं ! तुझें जाणें, प्राणेश्वरि, परिसुनी स्वर्गभुवनीं, अलाफांतें शंका व्यजाने करिती कोकिल वनीं; निमाली चिंताही सकल कमलांची अजि अहा ! कशी आतां चंद्रा अतुल सुषमा लाधाल, पहा ! सखे विद्युल्लेखास्फुरणचपला देउनि मला, सुरेंद्राच्या कांहीं दिवस उपभोगांस अतुल, अहा ! मंत्रभ्रष्ट क्षितिपातेस लक्ष्मी त्यजि जश, लया पुण्ये जातां, त्यजुाने ताशे गेलीस मजशी. असोनि त्वां भूमीवर चढावलें ज्या सुरपीं, प्रिया, नाथा, ऐशा अतिमधुर संबोधनपंदीं, तया मातें, कैशी धरणितलधूलींत सखये, दिवर्स्था होऊनी ढकालशि; दया कां तुज न ये ? अपूर्वा लावण्या, अनुपम सुशीला, सुविनया, अपारा चातुर्या, अगणित कलांतेंहि, मुनया, गुणां ऐशा कोणा निरविशि, सखे, आणि मजला ? २ १ मुक्तिरूप सखी तिच्या घरीं. २ हैं कटाक्षांचें विशेषण. निळ्या कमळांचा गर्व हरण करणाऱ्या ३ नवऱ्यामुलीला साहणेवर उभी करण्याचा एक संस्कार आहे, याला अनुलक्षून हें वर्णन आहे. ४ विजेच्या चमकण्याप्रमाणे चंचल. हे उपभो- गांचें विशेषण. ५ हेंही उपभोगांचेंच विशेषण. ६ स्वर्गवासिनी.