पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णशास्त्री चिपळूणकर. तयास आलिंगितों, प्रिये, मी नित्य बहु प्रीतीनें, की तो तुजला स्पर्शुनि आला असेल या बुद्धीनें ! लांब रात्र ही, क्षणासारखी लहान होइल केवीं ? तीव्र उष्णता दिवसाची ही लयास जाइल तेवीं. ऐशी चिंता उगिच करूनी त्यांत नसे फळ कांहीं, जरी जाणतों असें, तथापी ती मज सोडित नाहीं. जरी होतसे तुझ्या वियोगें मजला दुःख अपार, धीर धरितसें, पुढिल सुखाचा चित्तीं करून विचार. सखे शाहणी अससी, यास्तव विवेक करुनी तूही, अपुल्या आश्वासशील हृदया नानाविध हेतूंहीं. सदा कोण गे दुःखी ? अथवा कोण सुखी या लोकीं ? सुखदुःखें हीं चक्रन्यायें येती है अवलोकीं. कार्तिकमासी शाप संपतो माझा, तुज हैं ठावें, चार मास हे मिटून डोळे कैसे तरि कंडावे. नंतर, सखये, यथेच्छ पुरवूं मनिंचें सर्वहि कोड, करुनि विलासां, पूर्ववियोगें होतिल जे अति गोड. " २३ श्लोक. अहा कैसा झाला अवचित विधी निष्ठुर असा ! प्रिया एकाएकी अमरसदना गेलि सरसा ! मना आतां कोणा कथिशिल जिवींच्या हितगुजा ? सुखाच्या शब्दांनी कवण निववूं तापहि तुझा ? घरातें मी येतां दचकुनि उठोनी हंसुनियां, विशाला नेत्रांहीं अमृतरसदृष्टी करुनियां; न कां चित्ता आजी मधुरवचनीं हर्ष करिशी ? २४ २५ २६ २७ २८ २९ ५. विरहिविलाप. जगन्नाथरायपण्डित यांचा भामिनीविलास हा ग्रंथ फार प्रसिद्ध व रसि- कमान्य आहे. यांत करुणविलास ह्मणून एक प्रकरण आहे. त्याचें हें मराठी रूपांतर आहे. कोणा एका रसिकानें आपल्या परमप्रिय गुणसंपन्न पत्नीविषयीं यांत विलाप केला आहे. १ -१ चाकाचा प्रत्येक भाग जसा केव्हां केव्हां खालीं जातो व केव्हां केव्हां वर येतो तसैं मनुष्यास कधीं कधीं चार दिवस दुःखाचे येतात तर चार सुखाचे येतात.