पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ अभिनवकाव्यमाला - भाग पाहिला. वांछी, दुसरी तिच्या इच्छितो वामचरणघातातें. असे मांडला पाचमण्यांचा पिंजरा तेथें थोर, बसे त्यामध्यें कनकयष्टिवर रात्री अमुचा मोर; प्राणांची मम धनीन शिकवी नाचायास जयातें रक्तकंकणी युक्त करांनी धरूनियां तालातें. जेथें ऐशीं सकल लक्षणें, मित्रा ! तुज दिसतील, ज्याच्या द्वारीं शंखपद्मही, लिहिलेले असतील, तेंच आमुचें गृह, नसल्यानें मी जें उदास भासे; सहस्ररश्मी गगनीं नसतां कैसे कमल विकासे ? ३. यक्षस्त्रीवर्णन. साक्या. अंग जयेचें पातळ, रंगहि चंपकफुलासमान, दंतपंक्ति की कुंदकळ्यापरि दिसते विराजमान; जेवि तोंडलें पिकलें तेवीं ओंठ खालचा लाल, विरहें असती शुभ्र जाहले जीचे नाजुक गाल; विशाळ चंचळ काळे डोळे जे कां विलासखाणी, मनांत झुरती हरिणबालकें बचुनि जयांचें पाणी मत्तगजापरि मंद चालणें, उणें न कोठें कांहीं, विधिच्या हातुनि दुसरें ऐसें रूप उतरलें नाहीं ! घना ! या खुणांवरुनि ओळखी अपुल्या, बा ! वहिनीला, मुख्य सहावा प्राणचि आहे जी या मम शरिराला ! • भाषण जीचें परिमित, मंजुल, सरस आणि हितकारी, मी नसल्यानें जवळ एकटी पड्डाने झुरे जी भारी. वर्षाकाळी मज आठवुनी क्षणोक्षणी दुःखानें वाळुनि गेली असेल जी बहु, नलिनी जेवि हिमानें ! रडुनि रडुनियां सुजले डोळे असतिल खचित तियेचे, उष्णश्वारों कोमल ओंगहे सुकले असतिल साचे. गाल टेंकुनी हस्ततलावरि जी चिंतातुर बैसे, अलक लोंबती मुखावरी तैं, कमली मधुकर जैसे. १२ १३ १४ २ ३ ४ ६ ७ ८ १ तांबडा अशोक तरुणींनीं चरणताडन केले ह्मणजे याला फलें येतात अशी कवींची समजूत आहे. २ सूर्य.