पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णशास्त्री चिपळूणकर. परोपरीचीं रत्नकंकर्णे, तसेचि मौक्तिकहार. लाल कराया पाय रंगही, उटी तशी अंगास, सर्वहि देई कल्पवृक्षची एक जिथें वनितांस ! २. यक्षमंदिर. साक्या. त्या नगरीत धनेशगृहाच्या उत्तरेस दिसतें जें दुरूनि सुंदर मंदिर मोठें, तेंच जाण घर माझें; नानारली खचित जयाचें द्वार उंच बहु साजे, अपूर्व शोभा पाहुनि ज्याची इंद्रचापही लाजे. असे जवळ त्यां एक नवीनचि कल्पवृक्ष सुकुमार, थोर फुलांचे गुच्छ येउनी जो लवलासे फार; प्रिया करांनीं नित्य घालुनी पाणी सायंकाळी अतिकनवाळूपणें जयाला मुलासारिखा पाळी. आहे सुंदर तळेंहि तेथें लहानसें, ज्यामाजीं नित्य शोभती बहुत फुलोनी सुवर्णकमळे ताजीं. पाचेच्या पायऱ्या सभोंती असात त्यांत उतराया, जयांत नेमस्तचि जळ असतें क्रीडा स्त्रीस कराया. वर्षाकालहि येतां तेथें हंस सुखें वसताती, जवळहि असतां मानस तिकडे कधींहि ते नच जाती ! त्याच तळ्याच्या कांडी आहे क्रीडापर्वत, ज्याचें नीळमण्यांचें चमके सुंदर उंच शिखर तें साचै; • ज्याच्या भौती सुवर्णकदली झळकति चित्रविचित्रा, विजेंसहित तुज देखाने मजला आठवतो तो, मित्रा ! मध्ये मंडप मधुमालतिचा, गुलाब शोभति भोतीं, काय वर्ण ती सुखें, त्या स्थलीं जीं अनुभविलीं होतीं ! त्या कुंजाच्या जवळ बकुळिचा एक सुबक तरु आहे, तसा तांबडा अशोक तेथें चंचलपव पाहे. पहिला मजपरि तुझ्या सखीच्या वदनांतिल मदिरेतें ३ १० २ ३ ४ ६ ९ १० ११ १ त्या घराच्या. २ त्या तळ्यांत ३ या नांवाचें सरोवर. ४ विजेचें व सुवर्ण- कदलींचें साम्य, तसेंच मेघाचें व नीलमणिघटित क्रीडापर्वताचें साम्य विवक्षित आहे. ५ बकुलवृक्ष. तरुण स्त्रियांनी या झाडावर मद्याच्या गुळण्या टाकल्या ह्मणजे त्याला फुले येतात असें कवि मानितात.