पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णशास्त्री चिपळूणकर. किंवा तूंची घना, झांकिशी जेवीं शशिबिंबाला, तीच साजते बरवी उपमा ग्लान तिच्या बदनाला ! पहाशील तूं तिला कदाचित् देवातें पुजितांना, किंवा ध्याउनि माझी मूर्ती चित्रपर्टी लिहितांना; असेल अथवा पिंजऱ्यापाशी उभी पुसत मैनेला, ' कां गे ! आठवतो तुजला तो प्राणसखा रंगेला?" घेउनि हाती सारंगी वा काळक्रमण कराया, स्वर्ये रचियलीं मजविषयींचीं लागे गीतें गाया ! तैं डोळ्यांतुनि गळुनि अनुजळ जाई भिजोनि तार, स्वर्ये घेतला मर्धेच विसरे अलाफ वारंवार ! किती लोटले विरहदिवस हैं कळावयाकरितां जीं देवियलेली फुलें प्रतिदिनीं पुनः पुन्हां तीं मोजी. किंवा ध्यानीं मजला आणुनि माझा मानससंग अनुभवुनी त्या परमानंदी झाली असेल दंग ! बहुतकरूनी, घना, सुंदरी काळ कंडितां यावा, ह्मणुनि यापरी करिती, जवळी नसतां प्राणविसावा ! ४. यक्षसंदेश. साक्या. " खिडकित पाडाने तुला, चकित ती होतां विस्मयभावें, यापरि मधुरस्वरें तिला तूं आश्वासुनि बोलावें:- “पतित्रते, मी तुझ्या पतीचा जिवलग मित्र असोनी, आलो आहे येथें त्याचा निरोप तुज घेवोनी प्रवासिकांतें स्वगृहीं जाया त्वरा करुनियां नित्य, तज्जायांतें सुखित करावें आहे हैं मम कृत्य.' यापरि भाषण तुझें परिसुनी आनंदुनि ती फार, सीता जेवीं वायुसुताचा, करिल तुझा सत्कार. आयकेल ही तुझ्या मुखांतुनि कुशलमयी मम वार्ता, निरोप पतिचा आणि गांठ हीं सम गणिती विरहार्ता. सांगावें मग तिला " तुझा पति रामगिरीवर राहे, खुशाल अससी कीं ? ऐसें तुज त्यानें पुशिलें आहे. तुह्मांसारखे बहुत गांजले जन जे दुर्देवानें, १ हनुमंताचा. १२ १३ १७ १ २ ४ ६