अभिनवकाव्यमाला-भाग पहिला. जेथें नित्य फुलाने तरू त्यांवरी गुंगती भुंगे, नित्य डोलती विकसुनि नलिनी कलहंसांच्या संगें; नित्य नाचती मोर उभारुनि सुंदर थोर पिसारे, प्रकाशुनीयां नित्य चंद्रही उजळी प्रदेश सारे. अन्य हेतुंनीं न अश्रु जेथें, तें केवळ आनंदें, दुजा न जेथें, कामज्वरची निवार्य जो स्वच्छंदें; प्रेमकतहची, दुजें न भांडण जेथें विदित जनांला, तारुण्याविण अन्य वय नसे ठावें कधिंहि तयांला. मधुर मृदंगादिक वाद्यांचे ध्वनी ज्यांत उठताती, तळीं जयांच्या बिंबाने तारा फुलांपरी दिसताती, अशा मंदिरी रत्ननिर्मिती यक्ष बसुनि आनंदें, सर्वे प्राशिती विलासिनींच्या मधुर मधु स्वच्छंदें. गंगातीरी कल्पतरुतळी सुटतां मंजुळ वारें, क्रीडति धन्या किन्नरकन्या जेथें बहु प्रकारें. कोणी कोणी कनकवाळुकेमाजी लपविति रखें, शोधुनि काढावया लागती कोणी ती अतियत्नें. क्रीडारंगी दंग सुंदरी होतां कांतांसंगें, दृढालिंगनादिकें करूनी उबली अपुली अंगें. शीतळ व्हाया गळां घालिती चंद्रकांतमाणेहार, पड्डुनि चांदणें वरी जयांतें सुटती पाझर गार ! अखंड लक्ष्मी नित्य करितसे वास जया नगरींत, किन्नर सुस्वर गाती जेथें धनदस्तुतिपर गीत; जेथिल उद्यानी काभीजन तरुण अप्सरांसंगें, परोपरीचे विलास करिती होउनि दंग अनंगें; दायीं ठायीं फुलें सुटोनी वेण्यांताने पडलेलीं, कोठें कोठें सुवर्णकमले कर्णीची गळलेलीं; तशीं विखरलेली मोतीही तुडाने गळ्यांतिल हार, दाविति जेथें रात्रीं झाला तरुणींचा संचार ! कुबेरमित्रत्वास्तव जेथें करितो शंकर वास, भयें तयाच्या चाप धराया नसे धैर्य मदनास; तथापि करिती विलासिनींचे कटाक्ष काम तयाचें, अचुक टाकिती हृदय वेधुनी जे की कामिजनांचें. वस्त्रे उत्तन, सुगंध सुमनें, मदिरा मधुरहि फार, ५ ७ १० ११ १२ १३ १४ १६ १७
पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/११
Appearance