पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिनवकाव्यमाला. भाग पहिला. twee कृष्णशास्त्री चिपळूणकर. जन्म- इ. स. १८२४, मृत्यु - इ. स. १८७८. या विख्यात रसिक पंडिताचा पद्यरत्नावली या नांवाचा एक अतिसुंदर लहानसा काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे. यांत मेघदूताचें साकी- बद्ध भाषांतर, अन्योक्तिकलाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली आणि विलाप अशीं पांच निरनिराळीं प्रकरणें आहेत. यांतील विद्याप्रशंसा आणि प्रश्नोत्तरावली हीं काव्यें बहुतेक स्वतंत्र आहेत आणि बाकी- चीं संस्कृतांतून मराठींत उतरलीं आहेत. हा ग्रंथ अत्यंत सरस व रमणीय असून अलीकडील महाराष्ट्रकाव्यांचें मोठें भूषण आहे. पुढील पहिले चार उतारे शास्त्रीबोवांच्या प्रसिद्ध मेघदूतभाषांतरांतून घेतले आहेत. मेघदूताचें संविधानक बहुश्रुत मराठी वाचकांच्या परिच- याचें आहे. १. अलकावर्णन. साक्या. विलासिनीच्या हस्तीं तेथें कमलें, कुंदकळ्याही शिरीं शोभती, मुखीं पांडुता येई लोभ्ररजांहीं; कर्णी विलसे शिरीष सुंदर, केश कुरबक साजे, नीपपुष्पही दिसते भांगी सुचवी घनांगमा जें. १ २ १ या षष्ठीचा संबंध शिर, मुख, कर्ण, केश व भांग या सर्वांकडे लावावयाचा. सहाही ऋतु त्या नगरीत एका वेळीं वास करितात हे दाखविण्याकरितां येथे प्रत्येक ऋतूंत होणाऱ्या एकेक पुष्पाचे वर्णन केले आहे. कमले शरदृतु सुचवितात. कुंदपुष्पें शिशिर दाखवितात. लोध्रफुलें हेमंतांत येतात. कुरचक (कोरांटी ) वसंतांत व शिरीष (जवस ) ग्रीष्मांत फुलतात. नीप (कळंच ) पावसाळ्यांत फुलती हैं तर खालीं कवीनेंच वर्णिलें आहे. २ अलकावतीत ३ मेघांचें येणे, पावसाळा.