पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काढतात, हे मी पाहिले आहे. सरकारी नोकरवर्ग संपावर गेला, की मात्र सरकारचे कचखाऊ रूप पुन्हा एकदा दिसून येते. परदेशी व्यवहारातदेखील असाच काहीसा प्रकार आहे. सिक्कीमसारखा छोटा देश. लॉर्ड कर्झनच्या दिमाखात एका दिवसात याच पुळचट सरकारने हस्तगत केला. बांगलादेशाच्या लढाईत लष्करीदृष्ट्या वरचढपणा प्रचंड असल्याने थोडीफार तरी हिंमत एका वर्षभराच्या अवधीन का होईना नेत्यांनी जमा केली? थोडक्यात, दांडग्यापुढे शरणागती आणि दीनदुबळ्यांपुढे दादागिरी अशी भारतीय राज्यव्यवस्थेची आणि लोकांचीही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती कचखाऊपणाची नाही, पुळचटपणाची नाही, अप्रामाणिक भेकडपणाची आहे.

६ सप्टेंबर २०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ९८