पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






माणसाचे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी वेगवेगळ्या मोजपट्ट्या


 गभरातील पुराणांत, इतिहासात, कथा कादंबऱ्यांत अगदी लहान मुलांच्या परिकथांत राजाचा सर्वोच्च गुण म्हणजे शौर्य. राज्य मिळवायचे ते तलवारीच्या जोरावर, टिकवायचे ते बाहूच्या बळावर. जसजसा काळ लोटत गेला तसतसे राजा स्वतः शूर योद्धा असला पाहिजे अशी आवश्यकता राहिली नाही. सैन्य बलाढ्य असले म्हणजे राजयक्ष्म्याने अंथरुणाला खिळलेला पेशवासुद्धा दरारा गाजवू लागला. सैन्यप्रमुख मानला जाऊ लागला. राजाची जागा लोकतांत्रिक अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी घेतली तसे सैन्याने राजकारणात लुडबूड करू नये, जो कोणी सत्ताधीश असेल त्याच्या आज्ञा मुकाट, बिनबोभाट पाळाव्या असा संकेत पडला; पण त्या देशांची संख्या अल्पमतात आहे. "राजकीय सत्ता तोफेच्या नळीतून येते," या माओच्या वाक्याचा आजही अंमल आहे.
 अगदी किरकोळ देशातील पोलिस स्वयंचलित अत्याधुनिक शस्त्रे घेऊन फिरतात; लंडनचा 'बॉबी' अजूनही हातात फक्त दंडुका घेऊन फिरतो. फरक प्रतीकांचा आहे; शासनाच्या मागे सामर्थ्य शस्त्राचे आहे. ते शस्त्र बाहेरील शत्रूविरुद्ध वापरता येते, तसेच देशात कोणी बंडावा पुंडाई केली तर त्याला शिस्तीत आणण्याकरिता वापरले जाते.
 सम्राट,शस्त्रे आणि शास्त्रे

 ताकदीचा वापर करून ऐतिहासिक व्यक्ती सत्तेवर आल्या; त्यांनी राज्ये स्थापली. शस्त्रांच्या ताकदीचा उपयोग राजघराण्यांनी केला; धर्मप्रसारकांनी केला, साम्राज्यवाद्यांनीही केला, समाजवाद्यांनीही केला. माणसाच्या अंगच्या पराक्रमापेक्षा त्याच्या हातातील हत्यार महत्त्वाचे असते हे स्पष्ट झाल्यावर अंगच्या शौर्यापेक्षा शस्त्रे आणि अस्त्रे तयार करण्याचे तांत्रिक आणि आर्थिक सामर्थ्य महत्त्वाचे ठरते. सत्ता शस्त्रांचीच; पण शस्त्रे चालविणाऱ्या अधड सैनिकांच्या

अन्वयार्थ - एक / ९८