पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळवायच्या आहेत आणि हे सगळे स्वतः अगदी कमलपत्राप्रमाणे नामानिराळे राहून करायचे आहे. अशा नेत्यांचे काय सांगावे? प्रसंगी पक्ष कार्यकर्त्यांना दुखावले तरी चालेल; पण नोकरदारांना दुखावणे त्यांना परवडणारे नसते. ही अशी मंडळी नोकरदारांचे महागाईभत्ते रोखण्याच्या प्रस्तावाला विरोध करणारच! नोकरदार नाराज झाले तर त्यांचे सगळेच भांडे फुटणार! दाऊद इब्राहिमला पोलिसांना, जकात अधिकाऱ्यांना खुश ठेवावे लागते तीच स्थिती या गवशा पुढाऱ्यांची.

(३ जून १९९३)
■ ■

अन्वयार्थ – एक / ९२