पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






विश्वासू आणि आज्ञाधारक


 दूरदर्शनवर एक सरकारी जाहिरात पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सुखद धक्का ही गोष्ट आजकाल अतिदुर्मीळ झाल्यामुळे त्याचा आणखी एक धक्का बसला.
 जाहिरातपटात एका सुसज्ज आणि सुशोभित फ्लॅटमध्ये नवरा घरी येण्याची वाट पाहत पत्नी उभी दाखवली आहे. नवरा एक सरकारातील उच्च पदाधिकारी, घामाघूम होऊन येतो आणि पत्नीला आपल्याला उशीर झाल्याचे कारण सांगतो, "आता सरकारी गाड्या बंद झाल्या ना, त्यामुळे बसने यावे लागले." पत्नी समजूत काढते, "सगळी माणसे ट्रॉम बसने प्रवास करतात, आपल्यालाच कशाला पाहिजे गाडी?" मग त्यांची एकुलती एक छोटी मुलगी बाबांना कोठे दूरचा फोन करायची आठवण करून देते आणि बाबा म्हणतात, "आता असे फोन नाही करता येणार." मुलगी विचारते, "सरकार असे पैसे वाचवून करणार तरी काय?" आणि तिघेजण मिळून एका सुरात उत्तर देतात, "हा पैसा पैसा देशाच्या विकासासाठी कामाला येणार इ.इ.!"
 महाराष्ट्र शासनाने खरोखरीच असा काटकसरीचा कार्यक्रम हाती घेतला आहे किंवा नाही कुणास ठाऊक? पण गाड्या आणि टेलिफोन याबाबत थोडीजरी काटकसर प्रत्यक्षात सुरू झाली असेल तर सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. प्रत्यक्षात काटकसरीला सुरुवात झाली नसेल तरी या जाहिरातपटाचे स्वागत करायला पाहिजे. कारण त्यामुळे सरकारद्वारेच नोकरदारांची जीवनशैली लोकांपुढे अधिकृतपणे आली.
 नोकरदारीची भरभराट

 या महितीपटात दाखवलेला सुसज्ज फ्लॅट, दिवाणखाना ही गोष्ट सरकारी नोकरांच्या काळात नोकरदारांची संख्या वाढली; पण त्यांचे पगार, भत्ते इतर

अन्वयार्थ - एक / ७९