पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आव्हान देणारी फुटीर चळवळ आणि त्याबरोबर एके-४७ सारख्या स्वयंचलित बंदुका दिसल्या, की या चळवळीची खरी आर्थिक प्रेरणा मादक पदार्थांच्या तस्करीची आहे अशी खूणगाठ बांधायला हरकत नाही.
 रहाटगाडगे चालूच
 शेतकऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येत ७०% आहे. आजही शेतीत गुणाकार होतो; पण शेतीक्षेत्राचा प्रभाव नगण्य आहे. संघटित कामगारांचा प्रभाव, त्यांची संख्या कमी असली तरी त्यामानाने अधिक आहे. राजकारणावर खरा प्रभाव गुंड दादांचा झाला आहे. भूखंड, तस्करी, मक्तेदारी आणि मादक पदार्थांचा व्यापार याचे अर्थकारण राजकारणाची दिशा ठरवते आहे.
 अर्थकारणात गुणाकार शेतीने आणला, त्या काळात शेतीने राजकारण ठरवले, कारखानदारीतील फायदा वरचढ असल्यामुळे तिने राजकारणाचे सूत्रचालन काही काळ केले. आज फायद्याची टक्केवारी गुन्हेगारी क्षेत्रात सर्वाधिक आहे, त्यामुळे राजकारणाची दिशा आणि प्रेरणा बहुजनांत नाही, गुन्हेगारीत आहे. महत्त्वाचा शेतकरी नाही, व्यापारी नाही, कारखानदार नाही, या कोणापेक्षा जास्त खंडणी देऊ शकणारे सरकार ताब्यात घेऊन बसले आहेत, दरोडेखोरीतून उभी राहिलेली शासनव्यवस्था पुन्हा आपल्या माहेरी आली आहे.

(२५ मार्च १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ७३