पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


निर्यात विरुद्ध सरकार


 पल्या देशात मनुष्यबळ स्वस्त आहे आणि यंत्रसामग्री महाग आहे. त्यामुळे हातमाग, हस्तोद्योग किंवा इतर कुटीरोद्योगातील माल आपल्याकडे खूप स्वस्त मिळतो. न्हावी, शिंपी, चांभार अशा कारागिरांच्या सेवाही हिंदुस्थानात अगदी कमी किमतीत मिळतात. याउलट परदेशांत यंत्रसामुग्रीने तयार झालेल्या वस्तू स्वस्त मिळतात आणि ज्या वस्तूंच्या उत्पादनात माणसाचा हात म्हणून लागला असेल त्या मौल्यवान बनतात. नायलॉनचे शर्ट म्हणजे हिंदुस्थानात केवढी किमती चीज समजली जाते, परदेशांत तीच वस्तू दुकानादुकानात ढिगांनी टाकलेली असते. उलट, सुती कपडे मात्र सुंदर आवेष्टनात शोभिवंत पद्धतीने ठेवल जातात आणि मोठ्या चढ्या किमतीस विकले जातात.
 माणसावर खर्च सर्वांत जास्त
 मनुष्यबळ स्वस्त असल्यामुळे आपण परदेशी व्यापारपेठेत उभे राहू शकू, कसोशीने स्पर्धा करू शकू अशी अनेकाची समजूत आहे; पण ही कितपत खरी आहे? कोणत्याही वस्तूच्या उत्पादनात मजुरीवर खर्च किती झाला याचा तपास काढला तर स्वस्त मजुरीच्या हिंदुस्थानातील श्रमशक्तीवरचा खर्च सगळ्या जगात जास्त असेल.
 स्वस्त; पण महागडी मजुरी
 येथील मजुरीचे दर कमी आहेत; पण माणसे गबाळ, आळशी, कामचुकार त्यामुळे परदेशांतील कारखान्यांत एकटादुकटा मनुष्य जे काम सहज आटोपून टाकतो ते काम करायला आपल्याकडे अर्धा डझन माणसे, त्यांच्यावर एक पर्यवेक्षक, अर्धा हिशेबनीस, १/४ व्यवस्थापक, १/८ निदेशक इतकी पलटण लावावी लागते. ही गोष्टही काही नवी नाही, सर्वांना माहीत आहे; पण भारतात श्रमशक्तीचा खर्च इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे, ते मजुरांची उत्पादकता

अन्वयार्थ - एक / ६३