पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उतारा पाहिजे असेल तर तिथे एक ठग असतोच. आपल्याच शेतातील एखादे झाड तोडायचे झाले तर संबंधित ठगाचे समाधान करावे लागते. व्यापाऱ्याच्या दुकानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठग येतात. व्यापारी काही न बोलता जी काही चीजवस्तू असेल ती त्यांना देऊन टाकतात. कारखानदारीची हीच स्थिती.
 बँकेत कर्ज पाहिजे, ठग आहेच बसलेला. आपलेच पैसे आपणच बँकेत ठेवलेले, ते नुसते काढून घ्यायचे म्हटले तरी पुन्हा ठगांना खुश करायला लागते. दुकान काढायचे तर संबंधित ठगांच्या टोळीला खुश केल्याशिवाय ते शक्य नाही. विजेचे कनेक्शन पाहिजे? वीजठग उभा ठाकलेला. टेलिफोन ठगांच्या तर वेगवेगळ्या टोळ्या आहेत. त्या प्रत्येकाचे समाधान वेगवेगळे केले तर टेलिफोन मिळणार. टेलिफोन मिळाल्यानंतर तो व्यवस्थित चालू राहावा अशी इच्छा असेल तर आणखी एक ठगाच्या टोळीला खुश ठेवले पाहिजे.
 गॅस सिलिंडर हवे असेल तर त्यासाठी ठगांची एक वेगळी टोळी, पासपोर्ट, तिकीट, कोणतीही गोष्ट करायचे म्हटले तर कोणातरी ठगाच्या दारात जाऊन त्याला खुश करण्यापलीकडे सामान्य माणसाला गत्यंतरच नाही. इंग्रज यायच्या आधी देशावर ठगांचे राज्य होते, आता तो पुन्हा एकदा 'ठगीस्तान' बनला आहे.
 रडण्यापरीस हसणे बरे
 या ठगीचा बंदोबस्त करणारा नवा लॉर्ड बेंटिक केव्हा अवतरेल ते सांगणे कठीण आहे; पण कोलकत्त्यातील एका पत्रकाराने एक नवाच मार्ग दाखवून दिला आहे. ठगांशी वादविवाद करायचा नाही. झटापट करायची नाही; तरीही त्यांना गोत्यात आणायचे असा मोठा सुंदर डावपेच आखला, एवढेच नाहीतर अमलात आणून दाखवला.
 हे पत्रकार महाशय एका हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी मूत्यूचा दाखला मागितला. कोणाच्या मृत्यूचा? तर स्वतःच्याच! पहिल्या ठिकाणी मृत्यू दाखला ठगांनी ५०० रुपयात जिवंत अर्जदाराच्या मृत्यूचा दाखला देण्याचे कबूल केले; पण ५०० रुपये म्हणजे फार झाले अशी सबब सांगून पत्रकार तिथून निघाले आणि दुसऱ्या एका इस्पितळात गेले आणि तेथून स्वतःच्या मृत्यूचा दाखला फक्त २०० रुपयांत पदरात पाडून घेतला. बंगालमध्ये या प्रकरणाची आता मोठी चर्चा चालू आहे.
 ठगांना सगळा सरकारी पाठिंबा आहे. ठगीचे जाळे आता इतके व्यापक झाले आहे, की त्याच्याशी लढणे आता कोणालाच शक्य नाही. ठगीशी असा

अन्वयार्थ - एक / ५६