पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/350

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणजे अतिरेक्यांचे 'सरदार' धाटणीचे इंग्रजी. पत्रकारांशी बोलताना अतिरेक्यांचा प्रतिनिधी म्हणाला, “आयात करण्याखेरीज पर्यायच नाही. पंजाबचा गहू खरीदला तर तेवढा गहू खासगी व्यापारातून सरकारी वाटप व्यवस्थेत आला असे होईल. त्यामुळे अन्नधान्याचा एकूण पुरवठा वाढणार नाही." 'Without any net additionality to total availability' या ॲडिशनॅलिटी शब्दाच्या 'सरदारी' इंग्रजीने या कारस्थानाचे बिंग फुटले; पण अतिरेक्यांना अन्नमंत्रालयातून हुडकून काढून हुसकावून लावण्याचे काम अजून बाकीच आहे!

■ ■

अन्वयार्थ - एक / ३५१