पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/343

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याचा माझा मीच शोध घेतो आहे!
 अल्डस हक्सले, गर्भश्रीमंत उमरावांच्या घराण्यात जन्मलेले; पण सगळेच खानदान मोठे विचारवंतांचे. वडील थॉमस हक्सले निसर्गशास्त्रज्ञ. माकडापासून मनुष्याची निर्मिती झाली हा सिद्धांत डार्विनने मांडल्यावर या दोन प्राण्यांमधील साधर्म्याचा मोठ्या चतुरस्त्र प्रतिभेचे. एकाच वेळी जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी इंग्लंडच्या राजकारणात मोठी महत्त्वाची भूमिका बजावली. डार्विनच्या प्रमेयांची सखोल विचक्षणा करून त्यांनी जी मांडणी केली तीच आज उत्क्रांतीवादाची अधिकृत मांडणी समजली जाते.
 अशा घराण्यात अल्डस हक्सले यांचा जन्म १८९४ साली झाला. बाप आणि वडीलबंधू यांची शास्त्रीय जिज्ञासू बुद्धी त्यांचेकडेही होती; पण बुजूर्गांची पद्धत शांतपणे संशोधन करण्याची. अल्डस हक्सले यांची बुद्धिमत्ता काहीशी विक्षिप्त तरुणपणी ते काहीसे मार्क्सवादी होते. नंतर त्यांनी शास्त्रविषयक चमत्कृतीजन्य लिखाणही केले आणि आयुष्याच्या शेवटी अध्यात्माचे मोठे जिज्ञासू अभ्यासक झाले. स्वतःच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी तरुणपणी मार्क्सवादी, मध्यम वयात विज्ञानकथा लेखक आणि उतारवयात वेदांती बनणाऱ्या लोकांची येथेच्छ टिंगल केली आहे.
 मेस्कॅलिन आणि कुंडलिनी

 अल्डस हक्सले यांच्या जन्माच्या आठच वर्षे आधी जर्मनीत निवडुंगापासून काढलेल्या एका अर्काचा माणसाच्या ज्ञानेंद्रियावर आणि विचारशक्तीवर परिणाम होतो असे सिद्ध झाले; पण अशा द्रव्यांचा नेमका परिणाम काय होतो? ऐकण्यात, पाहण्यात, स्पर्शात, वासात नेमका काय फरक पडतो? माणसाच्या अनुभूतींची आणि तर्क शक्तींची धार कमी होते की जास्त? याचा नेमका अभ्यास करायचा कसा? पोटॅशिअम सायनाईड म्हणजे महाभयाक विष. जिभेवर थेंब पडताच मनुष्य मरून जातो. तरीदेखील त्याची नेमकी चव जगाला कळावी याकरिता काही शास्त्रज्ञांनी स्वतःवर प्रयोग करून घेतले आणि मरण्यापूर्वी कागदावर चवीचे वर्णन करणारे शब्द दोन शब्द लिहिण्याची धडपड केली अशी कथा (कदाचित दंतकथा) आम्ही ऐकली होती. मेस्कॅलिन या द्रव्याचा माणसाच्या ज्ञानसंस्थेवर काय परिणाम होतो? याचा प्रयोग करायला अल्डस हक्सले पुढे झाले. मनुष्य जातीचे भाग्य असे की, हा प्रयोग त्यांच्यासारख्या प्रज्ञावंत प्रतिभाशाली सिद्धहस्त गद्यशैली लेखकाने केला. त्यांचे अनुभव त्यांनी एका पुस्तकात प्रसिद्ध केले आहेत. कोणी ऐरागैरा स्वत:वर प्रयोग करून घ्यायला

अन्वयार्थ - एक / ३४४