पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/340

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






सुख शांतीचा राजीनामा


 मुंबईतील एक जुने पत्रकार मित्र बरेच दिवसांनी भेटले. भेटल्याबरोबर त्यांनी इंग्रजीत प्रश्न विचारला, "शरदराव तुमचे हिरो कोण?" पत्रकार मी भेटल्यावर साधारणपणे शेती, शेतकरी, शेतकरी संघटना यांबाबत प्रश्न विचारतात. क्वचित राजकीय परिस्थिबद्दल माझे मत विचारतात; पण असे वैयक्तित प्रश्न क्वचितच विचारतात.
 "ही काय नवीन विचारपूस चालली आहे?" मी विचारले. पत्रकार मित्र मुंबईतील एका प्रख्यात इंग्रजी दैनिकात एक नवीन सदर चालवीत आहेत. सदराचे नावच 'माझे आदर्श' किंवा माय हिरो असे आहे. जान्यामान्या लोकांना त्यांच्या आदर्श व्यक्ती कोणत्या त्याबद्दल विचारून त्या त्यांना का आदर्श वाटतात याबद्दल थोडक्यात टिप्पणी या सदरात होते. हिरो या शब्दाचा मराठीत अनुवाद निदान सिनेमा आणि नाट्यसृष्टीत नायक असा होतो; पण अमूक अमूक व्यक्तीला मी हिरो मानतो याचा व्यवहारात अर्थ असा होतो, की अशा व्यक्तीला मी केवळ निर्दोषच नव्हे तर काही प्रमाणात अलौकिक मानतो. आपापल्या हिरोषियी बोलताना लोक डोळे विस्फारून आणि भावनाविवश होऊन बोल लागतात. माझ्याबाबतीत जिच्या चरणी लीन व्हावे, तिचे अक्षरनअक्षर प्राणपणाने झेलावे आणि ब्रह्मवाक्य मानावे, जिचे सगळे चारित्र्य आदर्श मानावे अशी व्यक्ती विभूती कोणीच नाही.
 मा xxxxx परमपूज्य!

 उलट तारुण्याच्या भरात, शक्तीच्या अमदानीत, महाविद्यालयाच्या पहिल्या काही वर्षांत ग्रंथप्रामाण्य आणि व्यक्तिपूजा यांचा पगडा मुळातून उखडून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. त्या काळात, कोणत्याही व्यक्तीचा किंवा ग्रंथाचा आपल्या मनावर पगडा राहू नये याकरिता मी आणि माझ्या सहाध्यायी

अन्वयार्थ - एक / ३४१