पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/329

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकेकाळी लोकसंख्यावाढीचे अधिक महत्त्वाचे कारण बनले आहे. त्यामुळे जनसंख्येचा आकडा वाढतो आहे. एवढेच नव्हेतर समाजाची गुणवत्ता कमी होत आहे. नवीन दमाच्या तरुण रक्ताच्या पिढीचे प्रमाण घटते आहे. पेन्शन खाऊन जगणाऱ्या म्हाताऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. या म्हाताऱ्यांना जगविण्याकरिता अब्जावधी रुपयांचा खर्च वैद्यक क्षेत्रात होत आहे. एका बाजूला जन्माची संख्या घटावी म्हणून खर्च होत आहे, तर दुसऱ्या बाजूला 'अंगम गलितम् पलितम् मुंडम्' झालेल्यांना पराकाष्ठेने जिवंत ठेवण्यासाठी तंत्र आणि साधने यांचा वारेमाप उपयोग होत आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी गर्भाचा प्राण बिनदिक्कत घेण्याचा पुरस्कार हिरीरीने करणारी मंडळी म्हाताऱ्यांची संख्या कमी करण्याचे काही उपाय सुचवत नाहीत. निदान म्हाताऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी समाजाने खटाटोपी खर्च करण्याची गरज नाही, इतकेही बोलत नाहीत. 'अर्भकांना मारा, म्हाताऱ्यांना जगवा' अशा स्वरूपाच्या कुटुंबनियोजनाने समाज म्हातारे होत चालले आहेत.
 कैरोत जमलेले नोकरशहा होते. त्यांनी नोकरशाहीचे हित जोपासले. त्यातील बहुतेक पन्नाशीच्या वर असल्याने त्यांनी म्हाताऱ्यांचे हित सांभाळले. कैरो परिषदेच्या गालिचा बाजाराची एकढीच निष्पत्ती आहे.

(७ ऑक्टोबर १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३३०